मुंबई, 14, जून: परीक्षा बोर्डाची असो वा कोणत्या विद्यापीठाची प्रश पत्रिकांमध्ये लहान मोठ्या चूक होतच असतात. अगदी या वर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्येही काही चुका आढळून आल्या. मात्र राज्यातील संत गाडगेबाबा विद्यापीठात जे घडलंय ते बघून तुम्ही शॉक व्हाल. मराठी मिडीयमच्या पेपरमध्ये चक्क इंग्रजी आणि हिंदी भाषेतून प्रश्न विचारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सध्या विविध शाखांची परीक्षा सुरु आहे. यादरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. MA भाग 1 सेमिस्टर 2, पत्रकारिता विभागाच्या परीक्षेत मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी आणि इंग्लिशमधून प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आली.
ITBP Recruitment: तब्बल 69,100 रुपये पगार अन् पात्रता फक्त दहावी पास; ITBP मध्ये बंपर भरतीची घोषणा
अमरावती विद्यापीठात ऍडव्हर्टायझिंग मीडिया या मराठी पेपरमध्ये प्रश्न क्रमांक तीन, चार,पाच व सहा प्रश्न क्रमांक 7 मधील सर्व टिपणी लिखाणाचे प्रश्न हिंदी भाषेत देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळच उडाली. आता लिहावं तरी काय असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता. काही काळ सेंटरवरही तणाव निर्माण झाला होता.
Success Story: अवघ्या 18 रुपये रुपये पगारावर घासले भांडे, टेबलही पुसले; आज ते आहेत 300 कोटींच्या कंपनीचे मालक
हा प्रकार लक्षात येताच सर्व विद्यार्थी हे अमरावती विद्यापीठात पोहाचले होते. आता हा पेपर पुन्हा घेण्यात येईल काय की या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना [पूर्ण मार्क्स देण्यात येतील याबाबत अजूनही विद्यापीठाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तरी या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळत होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.