मुंबई, 02 ऑक्टोबर: संरक्षण मंत्रालय मुंबई (Ministry of Defence Mumbai) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MOD Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदभरतीबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया.
या पदांसाठी भरती
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - एकूण जागा 13
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे फिजिक्स, केमेस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये B.Sc. ची पदवी असणं आवश्यक आहे. तसंच जाहिरातीत देण्यात आलेल्या काही क्षेत्रांमध्ये कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
हे वाचा - IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे भरती
वयोमर्यादा
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - उमेदवारांचं वय हे तीस वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील आयुच्या उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
कशी होणार निवड
या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीनं पार पडणार आहे. त्यासाठी दहा मार्कांचं इंग्रजी, Aptitude दहा मार्कचं, दहा मार्कांचं Reasoning, वीस मार्कांचं विज्ञान तर पन्नास मार्कांचं फिल्ड किंवा ट्रेड्शी संबंधित प्रश्न असणार आहेत.
अशा पद्धतीनं करा अप्लाय
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एका चांगल्या प्रतीच्या कागदावर संपूर्ण अप्लिकेशन लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. हा कागद व्यवस्थितपणे एका लिफाफ्यामध्ये ठेऊन त्यावर ज्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहोत त्या पदाचं नाव लिहायचं आहे. हा लिफाफा संबंधित दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पाठवायचा आहे.
हे वाचा - क्या बात है! IT कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते आठवड्यातून 3 दिवस सुटी
या पत्त्यावर पाठवा अर्ज
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वेटीवर, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2021
JOB TITLE | MOD Mumbai Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - एकूण जागा 13 |
शैक्षणिक पात्रता | फिजिक्स, केमेस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये B.Sc. ची पदवी |
वयोमर्यादा | उमेदवारांचं वय हे तीस वर्षांपर्यंत असणं आवश्यक |
कशी होणार निवड | लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mod.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब