मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे नोकरीची संधी; 85,000 रुपये मिळणार पगार

IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे नोकरीची संधी; 85,000 रुपये मिळणार पगार

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 02 ऑक्टोबर:  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IISER Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रधान तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ अध्यापक सहयोगी, अध्यापन सहयोगी, कार्यालय सहाय्यक, वित्त व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रधान तांत्रिक अधिकारी (Principal Technical Officer)

वरिष्ठ अध्यापक सहयोगी (Senior Teacher Assistant)

अध्यापन सहयोगी (Teaching Assistant)

कार्यालय सहाय्यक (Office Assistant)

वित्त व्यवस्थापक (Finance Manager)

IISER recruitment 2021

IISER recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  अनुभव

प्रधान तांत्रिक अधिकारी (Principal Technical Officer) -  Biology मध्ये पीएचडी आवश्यक आणि पाच वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव आवश्यक.

वरिष्ठ अध्यापक सहयोगी (Senior Teacher Assistant) - M.Sc. पर्यँत शिक्षण आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

अध्यापन सहयोगी (Teaching Assistant) - M.Sc. पर्यँत शिक्षण आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - पदव्युत्तर शिक्षण आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

वित्त व्यवस्थापक (Finance Manager) - अकाउंट आणि पर्चेसमध्ये पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आणि पदव्युत्तर पदवी.

हे वाचा -  रेल्वेमध्ये 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी; या तारखेपर्यंत करा अर्ज

इतका मिळणार पगार

प्रधान तांत्रिक अधिकारी (Principal Technical Officer) - 75,000/- ते  85,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ अध्यापक सहयोगी (Senior Teacher Assistant) -  50,000/- ते 60,000/-  रुपये प्रतिमहिना

अध्यापन सहयोगी (Teaching Assistant) - 40,000/- ते 50,000/- रुपये प्रतिमहिना

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) -25,000/- ते 30,000/- रुपये प्रतिमहिना

वित्त व्यवस्थापक (Finance Manager) - 40,000/- ते 50,000/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा

प्रधान तांत्रिक अधिकारी (Principal Technical Officer) - 45 वर्षांपर्यंत

वरिष्ठ अध्यापक सहयोगी (Senior Teacher Assistant) - 45 वर्षांपर्यंत

अध्यापन सहयोगी (Teaching Assistant) - 30 वर्षांपर्यंत

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - 33 वर्षांपर्यंत

वित्त व्यवस्थापक (Finance Manager) -  40 वर्षांपर्यंत

हे वाचा - IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तब्बल 71 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - पदांनुसार 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021

JOB TITLEIISER Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीप्रधान तांत्रिक अधिकारी (Principal Technical Officer) वरिष्ठ अध्यापक सहयोगी (Senior Teacher Assistant) अध्यापन सहयोगी (Teaching Assistant) कार्यालय सहाय्यक (Office Assistant) वित्त व्यवस्थापक (Finance Manager)
शैक्षणिक पात्रता  अनुभव Biology मध्ये पीएचडी आवश्यक आणि पाच वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार25,000/- ते 85,000/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादा45 वर्षांपर्यंत

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.iiserpune.ac.in/userfiles/files/Web%20advertisement%2066-2021.pdf या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Pune, जॉब