मुंबई, 22 मे: मायक्रोसॉफ्टने यंदा हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यानंतर आता कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला आहे. अशातच पगारवाढ हवी असेल तर कंपनीच्या स्टॉकची किंमत वाढवण्यासाठी काम करा, असं कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी ख्रिस कॅपोसेला म्हणाले आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये पगारवाढ मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या स्टॉकची किंमत वाढावी, यासाठी काम करायला हवं, असं कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी (सीएमओ) ख्रिस कॅपोसेला यांनी म्हटलं आहे. पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे, त्यामुळे कर्मचारी या टेक कंपनीवर नाराज आहेत. अशातच ख्रिस कॅपोसेला यांनी इंटरनल कम्युनिकेशनच्या माध्यमातून हा मेसेज पाठवला आहे. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिलं आहे. महिन्याचा 40,000 रुपये पगार अन् थेट वन विभागात नोकरी; घाई करा; पात्र असाल तर इथे पाठवा अर्ज “आमच्या जवळपास सर्व कर्मचार्यांच्या अधिक पगार हवा असेल तर सर्वांत महत्त्वाचं लीव्हर म्हणजे स्टॉकची किंमत वाढवणं हे आहे. त्यामुळे जर तिमाहीतील महसूल वाढला तर स्टॉकची किंमतही वाढते आणि पर्यायाने त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या वाढीत रूपांतरित होतो,” असं कॅपोसेला यांनी कर्मचाऱ्यांना इंटरनल कम्युनिकेशनच्या माध्यमातून पाठवलेल्या मेलमध्ये म्हटल्याचं ‘फॉर्च्युन’च्या वृत्तात म्हटलंय. “मायक्रोसॉफ्ट AI ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपयुक्त ठरावं म्हणून अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि डेटा सेंटरच्या क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.,” असं कॅपोसेला म्हणाले. Google मध्ये जॉब हवाय? मग तुमच्या Resume मधून आताच काढून टाका ‘या’ चुकीच्या गोष्टी; वाचा IMP टिप्स या महिन्याच्या सुरुवातीला सीईओ सत्या नडेला यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इंटरनल ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली होती. नडेला यांनी नमूद केलं की, ‘मॅक्रो इकॉनॉमिक रक्शन्स’ नेव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी तसंच AI मध्ये शिफ्ट होताना आवश्यक गुंतवणूक करण्याच्या दृष्टिने आवश्यक महसूल मिळवण्यासाठी हे करणं आवश्यक होतं.’
“आम्ही या वर्षी आमचे बोनस आणि स्टॉक अवॉर्ड बजेट पुन्हा कायम ठेवणार असलो तरी, गेल्या वर्षी आम्ही आमच्या ऐतिहासिक अॅव्हरेजच्या जवळ बजेट यासाठी दिलं होतं तसं मात्र या वर्षी आम्ही करणार नाही,” असं त्यांनी ईमेलमध्ये लिहिलं होतं. कोणी थेट लगावली नेत्याच्या कानशिलात तर कोणी मारले नक्षली, ‘या’ दबंग महिला IPS ऑफिसर्सबद्दल ऐकलंय का? मायक्रोसॉफ्टमधील सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर इसाबेल मोरेरा यांनी कंपनीच्या निर्णयाचा निषेध करताना एक ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, कंपनीने पगारवाढ देण्याचा घेतलेला निर्णय हा जणू कर्मचाऱ्यांच्या तोंडात मारणारा निर्णय होता. ते ट्विट त्यांनी नंतर डिलिट केलं. मायक्रोसॉफ्टमधील नोकर कपात जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्टने मोठी नोकर कपात केली होती. त्यांनी तब्बल 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हे त्यांच्या एकूण कर्मचारी संख्येच्या 5% पेक्षा कमी आहे. कॉस्ट स्ट्रक्चर रेव्हेन्यू व अंदाजित कस्टमर डिमांड यामध्ये तोल राखण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता.