जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MHT CET Result 2023 : महाराष्ट्र CET चा आज निकाल; कुठे आणि कसा पाहायचा?

MHT CET Result 2023 : महाराष्ट्र CET चा आज निकाल; कुठे आणि कसा पाहायचा?

महाराष्ट्र CET चा आज निकाल (फाईल फोटो)

महाराष्ट्र CET चा आज निकाल (फाईल फोटो)

MHT CET Result 2023 : MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकाल सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 12 जून : MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर करेल. निकाल MHT CET 2023 च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील. पीसीएम ग्रुपसाठी एमएचटी सीईटी 2023 परीक्षा 9 ते 14 मे आणि पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान घेण्यात आली. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वर्षी एकूण 4.6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षा न देता विद्यार्थी पास, पीएचडी सुरू! परीक्षा देऊन विद्यार्थिनी मात्र नापास MHT CET 2023 चा निकाल कसा तपासायचा - सर्वप्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर portal links च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर Check MHT CET Result 2023 च्या लिंकवर जा. आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करा. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा. MHT CET 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर काउन्सलिंग केलं जाईल. याद्वारे इंजीनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. काउन्सलिंग सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यंदा अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यंदा पहिल्यांदाच मोबाईल ॲपमार्फत उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती मिळणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात