Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी; कोणाचा किती टक्के लागला निकाल; इथे बघा

MH BOARD 12TH RESULT: यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी; कोणाचा किती टक्के लागला निकाल; इथे बघा

 यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली

यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली

Maharashtra 12th Board Result: बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. तरीही परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. मात्र यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

    मुंबई, 08 जून: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC class 12 result) आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच मोबाइलवरही एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे. त्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.
    गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल हा विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता. यामध्ये दहावी आणि अकरावीचे गुण मार्क्स देण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. तरीही परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. मात्र यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. MH BOARD 12TH RESULT LIVE: बारावीच्या परीक्षेत मुंबईचा निकाल सर्वांत कमी; कुठला विभाग अव्वल? राज्यभरातून तब्बल 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी13,56, 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुळीच अव्वल ठरल्या आहेत. निकालाची काही वैशिट्ये कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे. राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे. 2020 च्या तुलनेत सुमारे पाच टक्य्यांनी वाढला निकाल. एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकाल लागला आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Bank exam, Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Maharashtra News, State Board

    पुढील बातम्या