मुंबई, 07 जून: यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा (Offline Board Exams) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. राज्यतील अनेक शहरांमध्ये बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षण दिल्यायनंतर परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनंच व्हाव्यात यावर विद्यार्थी ठाम होते. मात्र राज्य सरकारनं मागणी मान्य न करता ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेतल्या. मात्र आता याच परीक्षांचे निकाल (Maharashtra state board result dates) जवळ आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी (HSC) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, तर इयत्ता 10वी (SSC) परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार होत्या. शेवटची परीक्षा 23 मार्च रोजी होती. या परीक्षेचे निकाल उशिरा लागण्याची चिन्हं होती, मात्र आता बारावीच्या निकालाची जाहीर झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर उद्या म्हणजेच 08 जुने 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी चोवीस तासांहुनही कमी वेळ उरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोटात तर गोळा आला आहे. पण टेन्शन घेऊ नका. निकालाच्या या टेन्शनमध्ये तुम्ही तुमचं मन कसं शांत (How to be calm just before the board results) करू शकता याबद्दलच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. MH BOARD 12TH RESULT: गेल्या वर्षीच्या तुलनेत कसा असेल 12वीचा निकाल? ऑफलाईन परीक्षांचा होणार फायदा की तोटा? पालकांचं वाढलं टेन्शन जसे जसे बोर्डाचे निकाल जवळ येऊ लागतात तसं पालकांचं टेन्शन वाढू लागतं. आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळतील का? चांगले मार्क्स मिळाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का? अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत तर काय होईल? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ पालकणांच्या डोक्यात सुरु असतो. पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
आपल्या पाल्यांवर ठेवा विश्वास पाल्यांचा निकाल नक्की कसा लागेल याचं टेन्शन घेऊ नका. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवा. त्यांनी अभ्यास चांगला केला असेल तर त्यांना चांगले मार्क्स नक्की मिळतील. त्यांनतर प्रवेशाची प्रक्रियाही उत्तम पद्धतीनं पार पडेल. निकाल मान्य करा यंदा ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. म्हणूनच तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. जो निकाल लागले तो मान्य करा. अधिक मार्क्स मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका आणि कमी मार्क्स मिळाले म्हणून निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जा. MH BOARD 12TH RESULT: News18lokmat.com वर दिसेल थेट दिसेल निकाल, असं करा रिजिस्टर असं मन ठेवा शांत निकाल जाहीर होण्यासाठी अजून बरेच तास उरले आहेत. त्यामुळे आतापासून टेन्शन घेऊ नका. तुमचा वेळ मित्रांना, कुटुंबाला द्या. निकालाविषयी कमीतकमी बोला. निकालाविषयी कुठलीही भीती बाळगू नका.