Home /News /career /

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: पालकांनो, मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील, चिंता करू नका; याच आठवड्यात निकाल

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: पालकांनो, मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील, चिंता करू नका; याच आठवड्यात निकाल

आपल्या पाल्यांवर ठेवा विश्वास

आपल्या पाल्यांवर ठेवा विश्वास

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  मुंबई, 06 जून: कोरोनामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा न घेता या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल ऑफलाईन पद्धतीनं लावण्यात आला. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाचे निकाल (MH BOARD 10TH AND 12TH RESULT) लवकरच लागणार आहेत. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे. MSBTE Admissions: 11वी नंतर आता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाही सुरु; रिझल्टच्या आधीच करता येईल अर्ज पालकांचं वाढलं टेन्शन जसे जसे बोर्डाचे निकाल जवळ येऊ लागतात तसं पालकांचं टेन्शन वाढू लागतं. आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळतील का? चांगले मार्क्स मिळाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का? अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत तर काय होईल? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ पालकणांच्या डोक्यात सुरु असतो. पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आपल्या पाल्यांवर ठेवा विश्वास पाल्यांचा निकाल नक्की कसा लागेल याचं टेन्शन घेऊ नका. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवा. त्यांनी अभ्यास चांगला केला असेल तर त्यांना चांगले मार्क्स नक्की मिळतील. त्यांनतर प्रवेशाची प्रक्रियाही उत्तम पद्धतीनं पार पडेल. कधी लागणार बोर्डाचे निकाल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 7 जून किंवा त्यानंतर लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. आला..आला बोर्डाच्या निकालाचा आठवडा; प्रवेशासाठी लगेच 'ही' IMP कागदपत्रं जोडा
  किती वाजता जाहीर होणार निकाल
  दरवर्षी प्रमाणे यंदाहीदहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Career, Entrance Exams, Exam Fever 2022, Exam result

  पुढील बातम्या