मराठी बातम्या /बातम्या /करिअर /MCGM Recruitment 2021: पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज

MCGM Recruitment 2021: पॅरामेडिकल पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज

आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजनांना मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यापासून विविध योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्मचारी भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजनांना मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यापासून विविध योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्मचारी भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजनांना मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यापासून विविध योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्मचारी भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 19 मे : देशभरात कोरोना विषाणूच्या (Corona Virus Second Wave) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढली. दिवसाला तीन ते चार लाख रुग्ण आढळत होते, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा (Medical System) भारही प्रचंड वाढला. रुग्णसंख्येच्या मानानं उपचार करणारे डॉक्टर्स, परिचारिका, अन्य आरोग्य सेवक सगळ्यांचीच कमतरता जाणवू लागली. नवीन उपचार केंद्रं उभारण्यात आल्यानं तिथंही आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजनांना मान्यता दिली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यापासून विविध योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्मचारी भरतीलाही परवानगी देण्यात आली आहे.

    राज्य सरकारांनीही (State Government) विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून, मोठ्या प्रमाणावर नवीन कर्मचारी भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईत रुग्णसंख्या जास्त असल्यानं तिथं मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा वाढवण्यात येत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेनंही (BMC) आरोग्य यंत्रणेतील विविध रिक्त पदांसाठी (MCGM Recruitment2021) अधिसूचना जारी केली आहे.

    टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, या अधिसूचनेनुसार एकूण 185 पदांवर भरती करण्यात येणार असून, यात फार्मासिस्ट (Pharmacist), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) आदी पदांचा समावेश आहे.

    इच्छुक उमेदवार portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथं ऑनलाईन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना योग्यरित्या वाचणं आवश्यक आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास फॉर्म नाकारला जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.

    (वाचा - SBI मधील क्लार्क पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली; पाहा डिटेल्स)

    कोण अर्ज करू शकतं?

    जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता (Eligibility) निश्चित करण्यात आली आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची बी.एससी (B.Sc) पदवी असली पाहिजे. फार्मासिस्ट पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची बी.फार्म (B.Pharm) पदवी असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतच्या अधिक माहितीसाठी अधिसूचना नीट वाचा.

    वयोमर्यादा -

    या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय (Age) 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असावं. फॉर्म जाहीर होण्याच्या तारखेपासून वयोमर्यादा ग्राह्य धरली जाईल. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथिलक्षम असेल.

    (वाचा - Success Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला)

    रिक्त पदाबाबत माहिती -

    या पदांसाठी 185 जागांवर भरती करण्यात येणार असून, यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञपदाच्या 89 जागा, फार्मसिस्टसाठी 96 जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट या दोन्ही पदांसाठी दरमहा 18 हजार रुपये पगार (Salary) देण्यात येणार आहे.

    First published:

    Tags: BMC, Job alert, Jobs