मराठी बातम्या /बातम्या /करिअर /कोरोनातून सावरताना नोकरदारांना मोठी संधी! मुंबईसह या शहरांतील कंपन्या देतायेत मोठी पगारवाढ

कोरोनातून सावरताना नोकरदारांना मोठी संधी! मुंबईसह या शहरांतील कंपन्या देतायेत मोठी पगारवाढ

Success

Success

सर्वात जास्त पगारवाढ ऑफर देणाऱ्या शहरांमध्ये (Cities offering most salary hike) हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईचा समावेश आहे.

  नवी दिल्ली 07 डिसेंबर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरातील व्यवहार मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी कित्येक कंपन्यांना कामगार कपात करावी लागली होती, तर कित्येक ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, आता सगळीकडे अनलॉक होत असताना कित्येक कंपन्या नव्याने जॉईन होणाऱ्यांना 29 टक्क्यांपर्यंत अधिक (Companies offering 29% hike) पगारवाढ ऑफर करत आहेत.

  करिअरनेट (Careernet) या देशातील अग्रगण्य अक्युजेशन फर्मने केलेल्या सर्वेक्षणातील माहितीच्या आधारे इंडिया इंकने (India Inc) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणातून मिळालेला इंटर्नल डेटा हा 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दिल्या गेलेल्या 14 हजार जॉब ऑफर्सच्या (Job offers post Pandemic) आधारे तयार करण्यात आला आहे. देशभरात एम्प्लॉयर्सच्या हायरिंग सेंटिमेंटचा (Hiring Sentiment graph) आलेख हा वरच्या दिशेने जात आहे, तसेच ऑफर करण्यात येणाऱ्या पगाराचा आलेखही वाढत गेलेला या सर्वेक्षणात दिसून आला. 0-3 वर्षे आणि 3-7 वर्षे अनुभव असणाऱ्यांना सर्वात जास्त पगारवाढ ऑफर (Salary Hike post Pandemic) करण्यात आली.

  ग्लोबलच्या तुलनेत ‘लोकल’च वरचढ

  एकाच सेक्टरमध्ये एकाच प्रकारच्या नोकरीसाठी एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये जेवढा पगार ऑफर करण्यात येत होता; त्यापेक्षा जास्त पगार त्याच पदासाठी एप्रिल ते सप्टेंबर 2021मध्ये ऑफर करण्यात आला. त्यातही, ग्लोबल एम्प्लॉयर्सच्या तुलनेत ‘लोकल’ म्हणजेच डोमेस्टिक एम्प्लॉयर्सने (Domestic Employers offering more salaries) अधिक पगार ऑफर केला आहे. स्थानिक कंपन्यांनी फ्रेशर्सना 34 टक्क्यांपर्यंत, तर अनुभवी उमेदवारांना 36 टक्क्यांहून अधिक पगारवाढ ऑफर (Offers for Freshers) केली. तर ग्लोबल कंपन्यांनी फ्रेशर्सना 17 टक्के आणि अनुभवींना केवळ 15 टक्क्यांपर्यंत पगारवाढ ऑफर केली.

  दिल्ली-हैदराबादमध्ये सर्वाधिक पगारवाढ

  सर्वात जास्त पगारवाढ ऑफर देणाऱ्या शहरांमध्ये (Cities offering most salary hike) हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईचा समावेश आहे. 0-3 वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी हैदराबाद सर्वात चांगले ठिकाण असल्याचे सिद्ध झाले आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त 86 टक्क्यांपर्यंत पगारवाढ देण्यात आली. त्यापाठोपाठ बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईचा क्रमांक लागतो. तर 3-7 वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना दिल्लीमध्ये सर्वाधिक 41 टक्क्यांपर्यंत पगारवाढ ऑफर करण्यात आली. यानंतर बंगळुरू आणि मुंबईचा क्रमांक लागतो.

  हेही वाचा- 'इतिहास' घडवू शकतो तुमचं 'भविष्य'; History मध्ये आहेत करिअरच्या संधी; जाणून घ्या

  एकंदरीत सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असताना, स्थानिक कंपन्या अधिक जोमाने वर येत आहेत. कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांसाठी, किंवा नव्याने नोकरी शोधणाऱ्यांसाठीही सध्या चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

  First published:

  Tags: Career opportunities, जॉब