Home /News /career /

"Work From Homeच बरं रे बाबा"; कर्मचाऱ्यांच्या मनात Omicron ची भीती; ऑफिसमध्ये परतण्यास इच्छुक नाहीत

"Work From Homeच बरं रे बाबा"; कर्मचाऱ्यांच्या मनात Omicron ची भीती; ऑफिसमध्ये परतण्यास इच्छुक नाहीत

work from Home की work from office वाचा

work from Home की work from office वाचा

या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस पुन्हा सुरु होणार की नाहीत? (when work from Office will start?) हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.

    मुंबई, 06 डिसेंबर: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टनं (Omicron cases India) जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. भारतातही ओमिक्रोनचे बरेच (Omicron patients in Maharashtra) रुग्ण आढळत आहेत. मात्र पुन्हा ऑफिस सुरळीतपणे सुरु होईल (When all offices are resume) आणि ऑफिसला जायला मिळेल अशी स्वप्न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कंपन्यांना यामुळे धक्का बसला आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये (Work from Office) बोलावण्याचा तयारीत असलेल्या कंपन्यांना आता या Omicron मुळे निर्णय मागे घ्यावा लागतोय की काय अशी चिंता वाटू लागली आहे. तर आता सर्वकाही सुरळीत होणार आणि कोरोनाचा नायनाट होणार ही स्वप्नं बघणाऱ्या सामान्य नागरिकांमध्येही यामुळे दहशत निर्माण झाली आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस पुन्हा सुरु होणार की नाहीत? (when work from Office will start?) हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. ऑफिसपेक्षा WFH दरम्यान कर्मचाऱ्यांचा कसा होता परफॉर्मन्स? Gartner सर्व्हे बघाच IT आणि इतर कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स हा वर्क फ्रॉम होमदरम्यान (WFH performance of IT employees) उत्तम होता हे निरनिराळ्या सर्व्हेमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जीवाची जोखीम घेऊन कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये परतण्यास तयार नाहीत हे दिसून येतंय. जर ओमिक्रोनमुले पुन्हा तिसरी लाट आली तर अशावेळी ऑफिसम्दफाचे जाऊन काम करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होमचा पर्यायच कर्मचारिउ निवडतील असं दिसून येतंय. नामांकित कंपनी Google नंही अशाप्रकारचा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे Google नं निरनिराळ्या ऑफर्स (How to get job in Google) देऊन आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षीचे अखेरपर्यंत कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन काम सुरु करणार होते. मात्र आता Google नं आपला हा निर्णय बदलला आहे. Google नं अनिश्चित काळासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होम (Google gave WFH to employees) दिलं आहे. आपला वर्क फ्रॉम ऑफिसचा निर्णय पुढे ढकलला (Google Postponed WFO) आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये Omicron भारतात पसरतो की डेल्टाप्रमाणे आपण मात करण्यास यशस्वी होतो हे स्पष्ट होणार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला तर कर्मचारी मात्र वॊरक फ्रॉम ऑफिसपेक्षा वर्क फ्रॉम होमलाच पसंती देतील हे मात्र नक्की.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs

    पुढील बातम्या