मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career Tips: आता 'इतिहास' घडवू शकतो तुमचं 'भविष्य'; History मध्ये आहेत करिअरच्या अनेक संधी; जाणून घ्या

Career Tips: आता 'इतिहास' घडवू शकतो तुमचं 'भविष्य'; History मध्ये आहेत करिअरच्या अनेक संधी; जाणून घ्या

यामध्ये सरकारी आणि गैर-सरकारी दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी (Job Opportunities in History)आहेत. चला तर जाणून घेऊया संधींबद्दल.

यामध्ये सरकारी आणि गैर-सरकारी दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी (Job Opportunities in History)आहेत. चला तर जाणून घेऊया संधींबद्दल.

यामध्ये सरकारी आणि गैर-सरकारी दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी (Job Opportunities in History)आहेत. चला तर जाणून घेऊया संधींबद्दल.

मुंबई, 06 डिसेंबर: उमेदवारांना अनेक क्षेत्रांमध्ये उपलब्ध असतात. मात्र आजकालच्या काळात ऑफबीट क्षेत्रांमध्येही उमेदवार करिअर (Career on Offbeat field) करतात. इतिहासासारख्या (Career in History) प्रचंड मोठ्या आणि अभ्यासपूर्ण विषयामध्ये शिक्षण घेऊन करिअर करता येऊ शकतं. इतिहास किंवा इतर विषयांमध्ये (Education in history and Career) ऑनर्स पदवी घेऊन करिअरचा मार्ग निवडतात. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतिहासात पीएचडी केल्यानंतर, तुम्हाला तुमचे करिअर (career options in History) सुधारण्याच्या अनेक संधी मिळतील. यामध्ये सरकारी आणि गैर-सरकारी दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी (Job Opportunities in History)आहेत. चला तर जाणून घेऊया संधींबद्दल.

तीन विषयांमध्ये इतिहासाचं विभाजन  

भूतकाळातील कोणत्याही घटनेला इतिहास म्हणतात. इतिहासात साधारणपणे सारख्याच घटना सर्वत्र आढळतात, त्यामुळे समाजावर आणि देशावर प्रभाव पडतो. या आधारावर इतिहासाचे स्थूलमानाने दोन भाग केले जातात. एक असा इतिहास ज्याला लिखित पुरावे आहेत, तर दुसरा ज्याला लिखित पुरावे नाहीत. भारताच्या संदर्भात, इतिहास 3 भागांमध्ये विभागला गेला आहे- प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास.

इतिहासाचा अभ्यास केल्यावर करिअरचे अनेक नवीन मार्ग खुले होतात (Career After History study). जाणून घ्या, या विषयात स्पेशलायझेशन केल्यानंतर तुम्ही कुठे करिअर करू शकता.

सावधान! Government Jobs च्या नावावर होऊ शकते फसवणूक; 'या' गोष्टींकडे द्या लक्ष

पुरातत्वशास्त्रज्ञ (Archaeologist)

ऐतिहासिक स्थळांच्या ओळखीपासून ते त्यांच्या देखभालीपर्यंत सर्व सरकारांचे लक्ष आता लागले आहे. अशा स्थितीत पुरातत्व शास्त्रज्ञांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था आणि विद्यापीठे आहेत, जिथे पुरातत्व तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते.

ट्रॅव्हल एक्सपर्ट (Travel Expert)

आजच्या युगात लोकांमध्ये प्रवासाचा छंद वाढत आहे. एक चांगला इतिहासकार देखील चांगला प्रवास तज्ञ बनू शकतो. इन्फोटेनमेंट चॅनेलला नेहमी चांगल्या प्रवासी तज्ञांची गरज असते, ज्यांना ब्रॉडकास्ट मीडिया (career in Broadcast Media) मध्ये देखील स्थान मिळते.

संरक्षक आणि संग्रहालयशास्त्रज्ञ (Conservator and Museum Scientist)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझियम्स पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रम जसे की संरक्षक, संग्रहालयशास्त्रज्ञ देतात. इथून पदवी घेऊन वनसंरक्षक आणि संग्रहालयशास्त्रज्ञ होऊ शकतो. याअंतर्गत म्युझियम मॅनेजमेंट, रिसर्च, जनसंपर्क ते डिझायनिंगपर्यंत करिअर करता येईल.

संग्रहालय क्युरेटर (Museum curator)

हे देखील एक विशेष प्रकारचे करियर आहे. यामध्ये पुरातन वास्तूंच्या देखभालीपासून त्यांची ओळख पटवण्यापर्यंतचे काम केले जाते.

तुम्हालाही Typing येत असेल तर NHM नाशिक इथे लगेच करा अप्लाय; उद्या शेवटची तारीख

इतिहास तज्ञ (History Expert)

तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक आणि इतिहासाच्या क्षेत्रातील तज्ञ देखील होऊ शकता. त्यांना विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये मागणी आहे. त्याचबरोबर तज्ज्ञ म्हणूनही मागणी वाढत आहे. विशेषत: राजकीय इतिहासातील तज्ञांची मागणी आजकाल खूप वाढली आहे. या क्षेत्रांशिवाय शिक्षक म्हणूनही करिअर करता येते.

First published:

Tags: Career, Career opportunities