मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Maharashtra Talathi Bharti 2023: अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

Maharashtra Talathi Bharti 2023: अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

Maharashtra Talathi Bharti 2023: या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 22 जानेवारी: महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत केला तर मग जाणून घेऊया.

या पदांसाठी भरती

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)

एकूण जागा - 4122

Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

SSC MTS Recruitment 2023: 1-2 नाही तर तब्बल 11,000 जागांसाठी भरती सुरु; 10वी पाससाठी मोठी संधी

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

इतका मिळणार पगार

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

MPSC Recruitment: इतिहासातील सर्वात मोठी मेगाभरती; अप्लाय करण्याआधी या IMP डिटेल्स वाचल्यात ना?

ही कागदपत्रं आवश्यक

कागदपत्रं कागदपत्रं 
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटराष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटजातीचा दाखला (Caste Certificate)
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्रजात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

इतर आवश्यक कागदपत्रं 

अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)

माजी सैनिक प्रमाणपत्र

खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Maharashtra News