मराठी बातम्या /बातम्या /करिअर /राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा! पडणार जॉब्सचा पाऊस; विविध विभागांमध्ये होणार 9500 जागांसाठी भरती

राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा! पडणार जॉब्सचा पाऊस; विविध विभागांमध्ये होणार 9500 जागांसाठी भरती

विविध विभागांमध्ये होणार 9500 जागांसाठी भरती

विविध विभागांमध्ये होणार 9500 जागांसाठी भरती

राज्यात लवकरच तब्बल चार हजार पदांसाठी भरती होणार अशी घोषणा केली आहे. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भरतीची घोषणा केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 डिसेंबर: राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपुरातील विधानभवनात हे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्य सरकारच्यावतीनं काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत. तर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्नही सुरु आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच तब्बल चार हजार पदांसाठी भरती होणार अशी घोषणा केली आहे. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भरतीची घोषणा केली आहे. कुठे आणि किती जागांसाठी भरती होणार आहे याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

Maharashtra Police Bharti: अवघी काही सेकंदं ठरवतील तुमचं भविष्य; असं असेल शारीरिक चाचणीचं मार्किंग पॅटर्न

डॉक्टर, तंत्रज्ञांच्या भरतीची घोषणा

राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती करणार असल्याची घोष विधानसभेत केली आहे. आम्हीं एमपीएसच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत

तसंच एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो त्यामुळे चार हजार पदांसाठी करण्यात येणारी भरती TCS च्या माध्यमातून घेतली जाईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. तसंच आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

MIDC Recruitment: थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या सरकारी नोकरी; तुम्ही आहात का पात्र? मग करा अप्लाय

मुंबईत आशा सेविकांच्या भरतीची घोषणा

मुंबईतील महापालिका रुग्णालयातील बिकट परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांनी बघावं असा सवाल करण्यात आला होता. त्यावर आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांनी जशी पाच हजार स्वच्छता दूतांची नियुक्ती केली तशी आता 5500 आशा सेविकांचीही भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Cm eknath shinde, Job alert, Jobs Exams, Maharashtra News