SSC Board Exam : परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी करू नका या चुका

SSC Board Exam : परीक्षेला जाताना शेवटच्या क्षणी करू नका या चुका

दहावीची परीक्षा ही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. अशावेळी काही वेंधळेपणामुळे होणाऱ्या या चुका टाळल्या पाहिजेत.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : दहावीची परीक्षा अगदी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. काहीशी भीती आणि परीक्षेसाठी तयार असलेल्या विद्यार्थ्यांचा मात्र ऐन परीक्षेच्या वेळी फार गोंधळ होतो. ही परीक्षा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा समजली जाते. या परीक्षेवर आपलं पुढचं भविष्य आपण ठरवत असतो. अशावेळी वेंधळेपणा करून आपण चुका करतो आणि मग हातचे मार्कही घालवतो आणि भीतीनं पेपरमध्ये विसरायलाही होतं. अशावेळी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

चुका करू नका

ताण किंवा भीतीपोटी आपण अनेक चुका करतो. शांत मनाने पेपर लिहायला घ्या. ताण येऊ नये यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अभ्यास करू नका, पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या. आत्मविश्वास कायम बाळगा, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्य़ापेक्षा स्वत:वर जास्त विश्वास ठेवा.

आठवडा आहे तर शिक्षक आणि मित्रांसोबत संवाद साधा

आपल्याला कोणतीही शंका असेल तर आपल्या जवळचा मित्र किंवा विषय शिक्षकांसोबत आजच ती दूर करून घ्या. आयत्यावेळी गडबड नको.

हेही वाचा-SSC Board Exam 2020 : 'या' 7 सोप्या टिप्सने मिळवू शकता हिंदी विषयात चांगले गुण

उत्तर पत्रिकेची मांडणी सुसंगत असूद्या

उत्तराची मांडणी, त्यातील मुद्दे सुसंगत असूदे. प्रश्न क्रमांक आकृत्या त्यांना नावं देणं. या सगळ्या गोष्टी नीट काटेकोरपणे करा. खाडाखोड, गजबजाट न करता सुटसुटीत छान लिहा. त्यामुळे उत्तरपत्रिकेची मांडणी चांगली दिसते आणि मार्कही मिळतात.

ताण घेऊ नका

आपण उगाच हे जमेल का येईल का होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून ताण निर्माण करतो किंवा आपले मित्र उगाच आपल्या डोक्याला ताण देतात. त्यामुळे जेवढा अभ्यास झाला आहे तेवढ्यावर तुम्ही चांगलं लिहू शकता. हा आत्मविश्वास स्वत:वर ठेवा आणि छान पेपर लिहा.

कॉपी करण्यापेक्षा स्वत:चं डोकं लावून पेपर लिहा

कॉपी करण्यात आपला वेळ वाया जातोच आणि पकडली जाईल का याचं टेन्शनही असतं. त्यापेक्षा आपल्याला जेवढं य़ेत त्यावर पेपर सोडवला तर आपण आपल्या कष्टानं मार्क मिळवल्याचं समाधानही मिळतं आणि वेळ वाया जात नाही उलट पेपर पूर्ण होतो.

हेही वाचा-परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवा 7 गोष्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2020 01:15 PM IST

ताज्या बातम्या