Home /News /career /

MH BOARD 12TH RESULT: अखेर आला निकालाचा दिवस; कुठे, कधी आणि कसा बघाल? जाणून घ्या एका क्लिक वर

MH BOARD 12TH RESULT: अखेर आला निकालाचा दिवस; कुठे, कधी आणि कसा बघाल? जाणून घ्या एका क्लिक वर

तुम्ही निकाल कसा कुठे आणि कधी बघायचा हे बघितलं नसेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

    मुंबई, 08 जून:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी (HSC) परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या, तर इयत्ता 10वी (SSC) परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार होत्या. शेवटची परीक्षा 23 मार्च रोजी होती. या परीक्षेचे निकाल उशिरा लागण्याची चिन्हं होती, मात्र आता बारावीच्या निकालाची जाहीर झाली आहे. आजच बारावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 08 जुने 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. पण याहूनही तुम्ही निकाल कसा कुठे आणि कधी बघायचा हे बघितलं नसेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. MH BOARD 12TH RESULT: गेल्या वर्षीच्या तुलनेत कसा असेल 12वीचा निकाल? ऑफलाईन परीक्षांचा होणार फायदा की तोटा? इथे बघा निकाल बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे ग निकाल तुम्ही हा निकाल News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ हा लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल.
    कुठे बघता येईल निकाल हाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल 2021 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 12वीचे निकाल 2020 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी, 12वी 2021 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता. MH BOARD 12TH RESULT: वेळेवर गोंधळ करू नका; निकाल चेक करण्याआधी 'या' IMP गोष्टी ठेवा लक्षात किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाहीदहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Exam result

    पुढील बातम्या