Home /News /career /

MH BOARD 10TH RESULT: दहावीच्या निकालावर फक्त मार्क्सच नाही तर 'या' गोष्टीही करा चेक; भविष्यात होईल फायदा

MH BOARD 10TH RESULT: दहावीच्या निकालावर फक्त मार्क्सच नाही तर 'या' गोष्टीही करा चेक; भविष्यात होईल फायदा

आता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर (Maharashtra State Board 10th Result 2022 date) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई, 14 जून: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Maharashtra State Board Exam Result 2022) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे दहावीच्या बोर्डाचा निकाल (Maharashtra State Board 10th Result 2022) नेमका कसा लागणार याकडे सर्वांच लक्ष लागलं असणार आहे. बरेचदा निकाल लागला की विद्यार्थी आणि पालकवर्ग किती गुण मिळाले आणि कोणत्या विषयात किती गुण मिळाले हे बघत असतात. मात्र दहावीचा निकाल हा सर्वतोपरी महत्त्वाचा असतो. दहावीच्या निकालात तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जसा पद्धतीनं लिहिल्या असतात त्याच भविष्यात सर्व ठिकाणी लिहून येतात. म्हणूनच निकालातील या गोष्टी IMP असतात. थोडी भीती..थोडी उत्सुकता..विद्यार्थी झाले हँग; याच आठवड्यात लागेल 10वीचा निकाल दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात (Maharashtra State Board 10th Result 2022) जाहीर होतो. त्याप्रमाणे बारावीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर (Maharashtra State Board 10th Result 2022 date) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निकालाचं प्रिंट घ्या निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. शाळेतून किंवा कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात अकरावी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांनो, NEERI मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नका; आताच करा अर्ज सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career opportunities, Exam Fever 2022, Exam result, Maharashtra News, Ssc board

    पुढील बातम्या