मुंबई, 13 जून: यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही (Maharashtra state board exams Result) उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत. गेल्या आठवड्यात बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. तर या आठवड्यातच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र स्टेट दहावी बोर्डाच्या निकालाच्याआधीच अकरावी (11th FYJC Admissions in Maharashtra), पॉलीटेक्नीक (Polytechnic Admissions 2022) आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्दयार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा न करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र निकाल लागल्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवावी लागणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमचा बोर्डाचा निकाल कुठे आणि कसा तपासता येईल याबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. JEE Mains 2022: परीक्षेला अवघे 8 दिवस शिल्लक; आज प्रवेशपत्र जारी होण्याची शक्यता लवकरच अपलोडींगचं काम सुरु महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करते. त्यानंतर निकाल ऑनलाइन अपलोड केला जाईल. ‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल news18lokmat.com mahresult.nic.in maharashtraeducation.com mahahsscboard.maharashtra.gov.in. sscresult.mkcl.org असा चेक करा निकाल इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या. SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. आला रे आला निकाल जवळ आला; येत्या आठवड्यात ‘या’ तारखेला 10चा निकाल यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.