जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra SSC Result 2023: उद्या दहावीचा निकाल; पण पास होण्यासाठी किती गुण मिळणं आवश्यक माहितीये? इथे बघा माहिती

Maharashtra SSC Result 2023: उद्या दहावीचा निकाल; पण पास होण्यासाठी किती गुण मिळणं आवश्यक माहितीये? इथे बघा माहिती

 पास होण्यासाठी किती गुण मिळणं आवश्यक

पास होण्यासाठी किती गुण मिळणं आवश्यक

Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. चला तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01, जून: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा दहावीचा निकालनक्की कधी लागणार याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. चला तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

Maharashtra SSC Result Date 2023: सर्वात मोठी बातमी! स्टेट बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख ठरली; बोर्डानं केली घोषणा

इतके गुण मिळवणं आवश्यक स्टेट बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35 टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थी उपस्थित आणि उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क्स मिळू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना कोणत्याही पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत असं वाटत असेल तर असे विद्यार्थी पेपर्स रिचेकिंगलाही देऊ शकणार आहेत. याबाबत संपूर्ण प्रोसेस बोर्डातर्फे कळवण्यात येणार आहे. SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल एका क्लिकवर बघता येईल निकाल महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 2023 News18.com वर पाहता येईल. सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. 12वी विसरा; दहावीनंतरच्या ‘या’ भन्नाट डिप्लोमा कोर्सेसबद्दल ऐकलंय का? लाखो रुपये मिळेल सॅलरी यंदा राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी संपूर्ण 16,38,964 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 8,89,505 विद्यार्थ्यांची संख्या होती तर 7,49,458 इतकी विद्यार्थिनींची संख्या होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात