मुंबई, 29 नोव्हेंबर: राज्यात बंपर महाराष्ट पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल अठरा हजार जागांसाठी ही पोलीस भरतो होणार आहे. राज्यातील तरुण तरुणींना यामध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आता या पदभरतीमध्ये कोणताही लिंगभेद नं मानता तृतीयपंथीयांनाही संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना नेहमीच कोणत्याही नोकरी किंवा आरक्षणात डावलल्या जातं अशी तक्रार नेहमीच असते. त्यात कोणत्याही नोकरीमध्ये सामावून घेण्यास त्यांना दुजा भाव दिला जातो. मात्र सरकारी नोकरीमध्ये तरी आपल्याला संधी देण्यात यावी अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच राज्याच्या पोलीस भरतीमध्ये कुठलाही लिंगभेद नं मानता सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच त्यांची मणी मान्य करण्यात आली नाही तर न्यायलयात धाव घेऊ असा ईशारा तृतीयपंथीयांकडून देण्यात आला आहे. Maharashtra Police Bharti: फक्त नशिबाच्या जोरावर नोकरी मिळत नसते गड्यांनो; जॉबसाठी ही IMP पुस्तकं येतील कामी मुखमंत्र्यांना विनंती मॅट न्यायल्यानं दिलेल्या एका आदेशा नुसार तृतीयपंथियांना देखील भरती प्रक्रियेत संधी देणं गरजेचं असल्याच विधी ज्ञानी म्हटलंय. मात्र पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठीचा अर्ज भरण्याची मुदत केवळ 30 नोव्हेंबर पर्यंतच असल्याने यां तृतीयपंथियांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि पोलीस भरतीमध्ये संधी देण्यासाठी विनंती देखील केलीय. Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट राज्यातील पोलीस अधिकारीही सकारात्मक राज्यातील माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तृतीयपंथीयांना पोलीस दलात स्थान मिळावं म्हणून सकारात्मकता दर्शवलीय तर छत्तीसगडमध्ये तर पोलीस दलात त्यांना भरतीही केल्या गेलंय त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र केवळ लिंगभेद करून यांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठवेणार नाही अशी सर्वांना अपेक्षा आहे त्यामुळे यां तृतीयपंथीयांनी केलेल्या मागणी बाबत राज्यसरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न तृतीयपंथीयांनी सुरु केला सराव इतकंच नाहीतर अनेक तृतीयपंथीयांनी यासाठी सरावही सुरु केला आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक पदी नेमणूक झालेली राज्यातील पहिली तृतीयपंथी आहेत. निकिता प्रमाणेच तिचे इतर चार साथीदार देखील सुरक्षा रक्षकपदी आपलं कर्तव्य बजावतायत. मात्र आता यां सगळ्यांची जिज्ञासा वाढलीय आणि आता हे सगळेजण स्वप्न बघतायत ते पोलीस बणन्याचं. त्यासाठी निकिताने मैदानी सराव आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखिल सुरु केलाय. म्हणूनच आता या पदभरतीमध्ये कुठलाही लिंगभेद नं मानता सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.