मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MNLU Mumbai Recruitment: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथे होणार भरती; 12,500 रुपये मिळणार पगार

MNLU Mumbai Recruitment: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथे होणार भरती; 12,500 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 07 ऑक्टोबर:   महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई (Maharashtra National Law University Mumbai) इथे लवकरच पदवीधरांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra National Law University Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सचिवालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सचिवालय सहाय्यक  (Secretarial Assistant) Maharashtra National Law University Mumbai Recruitment 2021
Maharashtra National Law University Mumbai Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सचिवालय सहाय्यक  (Secretarial Assistant) -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधून पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता येणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 40 WPM पर्यंत टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शॉर्ट हँडचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. हे वाचा - IMCOST Recruitment: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडी ठाणे इथे भरती ही असणार जबाबदारी डेटा एंट्रीसाठी कागदपत्रे, साहित्य आणि माहिती गोळा करणे, एकत्रित करणे आणि तयार करणे. अपूर्ण कागदपत्रे आणि साहित्याची माहिती गोळा करणे. कागद किंवा श्रुतलेखातून डिजिटल दस्तऐवज तयार करणे. अचूकतेसाठी सर्व कागदपत्रे आणि माहितीचे पुनरावलोकन करणे आणि पर्यवेक्षकास कोणत्याही त्रुटींची माहिती देणे डिजिटल डेटाबेसमध्ये डेटा कॅप्चर करणे आणि नियमित बॅकअप घेणे. डेटाबेस, संग्रहण आणि फाइलिंग सिस्टम अद्ययावत करणे आणि देखभाल करणे. डेटाबेसचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करणे आणि त्रुटी किंवा विसंगती सुधारणे. आवश्यकतेनुसार डेटा अहवाल, स्प्रेडशीट आणि दस्तऐवज तयार करणे आणि निर्यात करणे. कार्यालयीन पुरवठा देखरेख करणे, स्कॅनिंग करणे आणि आवश्यकतेनुसार छपाई करणे अशी कारकुनी कर्तव्ये पार पाडणे. उच्च अधिकार्यांनी नियुक्त केलेले इतर कोणतेही काम करणे. इतका मिळणार पगार सचिवालय सहाय्यक  (Secretarial Assistant) - 12,500/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा पत्ता रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, हिरानंदानी गार्डन, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, पवई (मुंबई) 400076. हे वाचा - Google Off Campus Drive: Google मध्ये 'या' बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021
JOB ALERTMaharashtra National Law University Mumbai Recruitment 2021
या पदांसाठी भरती सचिवालय सहाय्यक  (Secretarial Assistant)
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधून पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता येणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 40 WPM पर्यंत टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शॉर्ट हँडचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार 12,500/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्तारजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, हिरानंदानी गार्डन, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, पवई (मुंबई) 400076.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nlunagpur.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Mumbai

पुढील बातम्या