मराठी बातम्या /बातम्या /करिअर /लवकरच जाहीर होणार महाराष्ट्र HSC रिझल्ट 2021, बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर असा कराल चेक

लवकरच जाहीर होणार महाराष्ट्र HSC रिझल्ट 2021, बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर असा कराल चेक

Maharashtra HSC Result 2021:  राज्याच्या शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021) जाहीर होणार आहे.

Maharashtra HSC Result 2021: राज्याच्या शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021) जाहीर होणार आहे.

Maharashtra HSC Result 2021: राज्याच्या शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021) जाहीर होणार आहे.

मुंबई, 21 जुलै: लवकरच महाराष्ट्र HSC चा (Maharashtra HSC Result 2021) निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड (MSBSHSE) द्वारे 12वीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्याच्या शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021) जाहीर होणार आहे. मात्र आता बारावीचा निकाल येत्या काही दिवसातच लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) निकालाआधी एक दिवस निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्याची शक्यता आहे.

12 वीचे विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in वर आपला बघू शकणार आहेत.

सचिन वाझेमुळे 5 महिने टळली राज कुंद्राची अटक, नाहीतर...

असा चेक कराल 12 वीचा निकाल

सुरुवातीला MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच mahahsscboard.maharashtra.gov.inवर जा.

वेबसाईटवर महाराष्ट्र HSC निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा. (जेव्हा लिंक अॅक्टिव्ह होईल).

त्यानंतर त्यात विद्यार्थ्यांनी 12 HSC चा रोल नंबर टाका आणि सबमिटवर क्लिक करा.

महाराष्ट्र HSC निकाल 2021 चा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

आपला निकाल तपासून तो डाऊनलोड करा.

दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Exam result, HSC