मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /फेब्रुवारी महिन्यातच राज कुंद्राला झाली असती अटक, सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला

फेब्रुवारी महिन्यातच राज कुंद्राला झाली असती अटक, सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला

Raj Kundra Arrested: राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांना राज कुंद्राविरोधात काही सबळ पुरावे गोळा केले आहेत.

Raj Kundra Arrested: राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांना राज कुंद्राविरोधात काही सबळ पुरावे गोळा केले आहेत.

Raj Kundra Arrested: राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांना राज कुंद्राविरोधात काही सबळ पुरावे गोळा केले आहेत.

मुंबई, 21 जुलै: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्राला (Raj Kundra) सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकच खळबळ माजली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांना राज कुंद्राविरोधात काही सबळ पुरावे गोळा केले आहेत. मात्र धक्कादायक म्हणजे राजला अटक करण्याची तयारी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच केल्याचं समजतंय. तसंच सचिन वाझे (Sachin Waze) मुळे राज कुंद्राची अटक लांबणीवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

ज्यावेळी मुंबई पोलिसांनी राजला अटक करण्याची तयारी सुरु केली होती. त्याच दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्यामुळे पोलिसांचं संपूर्ण लक्ष त्या प्रकरणाकडे वळलं गेलं. त्याकाळात बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात राज कुंद्रा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही बदल झाली होती. मुंबई पोलीस दलात झालेल्या बदलांमुळे साक्षीदार आणि पुरावे असतानाही राजच्या अटकेसाठी आणखी 5 महिन्याचा कालावधी लागला. जर सचिन वाझे प्रकरण त्याकाळात समोर आलं नसतं तर राज कुंद्राला फेब्रुवारी महिन्यातच अटक झाली असती.

जैश-ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याचा हल्ला, पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी-मुलीवर गोळीबार

फेब्रुवारी महिन्यातच राज विरोधात तक्रार दाखल झाली होती. मुंबई पोलिसांचे ज्वाइंट कमिश्नर मिलिंद भराम्बे (Milind Bharambe) यांनी सांगितलं की, मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं. (Raj Kundra arrested)

नाशकात मित्राकडूनच घात, अल्पवयीन मुलीला फिरायला नेलं अन् गुंगीचं औषध देत अत्याचार

पोलिसांनी सांगितलं की, फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. अनेक लोकांचे जवाब देखील नोंदवण्यात आले होते. तपासात समोर आलं की काही लहान कलाकारांना (Small artists) वेब सीरिज, शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचं लालच दिलं जायचं. त्यानंतर ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स घेतले जायचे. बोल्ड सीन्स द्यावे लागतील सांगितल जायचं. सुरुवातीला सेमी नूड आणि नंतर पूर्ण नूड अशा पद्धतीने शूट केलं जायचं.

First published:
top videos

    Tags: Mumbai police, Sachin waze, Shilpa shetty