Home /News /career /

महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

Maharashtra HSC Result 2021: राज्याच्या शिक्षण मंडळाच्या बारावी निकालासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

    मुंबई, 30 जुलै:  काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. त्यातच आताच समोर आलेल्या माहितीनुसार, इयत्ता 12 वी राज्य बोर्ड निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्यानं निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जुलै अखेरीस 12 वीचा निकाल लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार असला तरी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता (official announcement awaited) वर्तवण्यात आली होती. 31 जुलैपर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना दिले होते.  (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) मोदींनी नितीन गडकरींवर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांच्या निवासस्थानी खलबतं परीक्षा रद्द यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 12 वीच्या निकालाचं विशेष मूल्यांकन दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Exam result, HSC

    पुढील बातम्या