मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार; सर्व कॉलेजेस ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार

मोठी बातमी! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार; सर्व कॉलेजेस ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.

मुंबई, 6 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेसही ऑफलाईन (Offline Colleges in Maharashtra) पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र अजूनही राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस (University Campus starting offline classes in MH) सुरु करण्यात आले नव्हते. मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन (Offline classes in University campus) पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आता गेल्या दोन वर्षांपासून ओस पडलेले युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार आहेत.

SBI मध्ये तुम्हालाही मिळू शकते क्लर्क म्हणून नोकरी; आधी समजून घ्या Exam Pattern

सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि त्या अंतर्गत येणारे कॉलेजेस आणि विद्यापीठं बंद होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला असून नियमही हटवण्यात आले आहेत. म्हणूनच आता सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत.

उदय सामंत यांनी राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय ऑफलाईन सुरु राहणार या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय पुन्हा सुरु करावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी English ची तयारी करताय? मग या टिप्समुळे होईल मदत; वाचा

काय आहे निर्णय

ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोज झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीनं उपस्थित राहता येणार आहे. मात्र ज्यांनी अजूनही कोरोना लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांना उपस्थित राह्ता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे अशीही माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Breaking News, Career, Education, Maharashtra News, Pune university