मुंबई, 04 एप्रिल: आजकालच्या काळात कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, आणि इतरही क्षेत्रातील अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रांकडे (Jobs in banking Sector) वळू लागले आहेत. बँकेत जॉब करण्यासाठी लाखो उमेदवार दरवर्षी अर्ज करू लागले आहेत. दरवर्षी लाखो तरुण या देशात सरकारी नोकरीची तयारी करतात. त्यातही ते बँक जॉब आणि UPSC यांना त्यांच्या सर्वोच्च प्राधान्यावर ठेवतात. सरकारी बँकेत (How to get Government Jobs) नोकरी मिळणे सोपे नाही. बँकेच्या परीक्षा (banking Exam Preparation) खूप कठीण असतात आणि त्यासाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात (How to get job in Banking sector) स्पर्धा भयंकर वाढली आहे. मात्र तुम्हीही बँकेत जॉब (How to do jobs in banks) करू इच्छित असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI jobs) कशी मिळवावी याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) दरवर्षी बँक क्लर्क परीक्षा घेते. साधारणपणे प्रत्येक बँकेचा परीक्षा पॅटर्न सारखाच असतो (Bank Exam Pattern). SBI लिपिक नोकरीसाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांना परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रमाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. हे त्यांना सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करते. करिअरमध्ये सतत पुढे जाण्यासाठी ‘हे’ सॉफ्ट स्किल्स आवश्यक; तुमच्यामध्ये आहेत ना?
SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा
SBI क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. त्यानुसार एकूण 100 गुणांचा पेपर तयार केला जातो. यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (QA) मधून ३५ प्रश्न आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातात. या परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना 1 तास देण्यात आला आहे. उमेदवारांनो, स्पर्धा परीक्षांच्या कोणत्या विषयासाठी कुठलं पुस्तक बेस्ट? वाचा
SBI लिपिक मुख्य परीक्षा
एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी मिळते. लिपिक मुख्य परीक्षेत ४ विषयांमधून प्रश्न विचारले जातात. यात रिझनिंग आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूडमधील 60 गुणांचे 50 प्रश्न असतात. इंग्रजी विषयातून 40 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो. QA मधून 50 गुणांचे 50 प्रश्न विचारले जातात आणि आर्थिक जागरूकता विषयातून 50 प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेत एकूण 200 गुणांचे 190 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असते.