जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SSC Result:'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण

SSC Result:'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण

SSC Result:'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण

चित्रपटात सहजतेने वावरणारी झेंडू अर्थात सायली तितक्याच सहजपणे परीक्षेला सामोरं गेली…

  • -MIN READ
  • Last Updated :

पंढरपूर, 29 जुलै: तुम्ही मराठी सिनेमा ‘एलिझाबेथ एकादशी’ बघितालाच असेलच आणि त्यातील झेंडुचा मनाला भावणारा संवाद ‘गरम बांगड्या गरम बांगड्या’ खूपच फेमस झाला होता. रुपेरी पडद्यावर गणितात 100 पैकी 42 गुण मिळालेल्या झेंडू म्हणजेच सायली भंडारकवठेकर हिला प्रत्यक्षात दहावीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क 96 मार्कस मिळाले आहे. सायलीने दहावीची परीक्षा 98 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आहे. हेही वाचा… SSC Result 2020 : 30 वर्ष वयाचा विद्यार्थी, अखेर झाला 16 वर्षानंतर दहावी पास!

जाहिरात

चित्रपटात सहजतेने वावरणारी झेंडू तितक्याच सहजपणे परीक्षेला सामोरी गेली असल्याचं ती सांगते. कोणत्याही प्रकारचं टेंशन न घेता हसतखेळत एवढे गुण मिळवल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. सायलीची मैत्रीण सावनी दोशी हिने तर चक्क 100 टक्के गुण मिळवून पंढरपूरमधील कवठेकर शाळेच नाव मोठं केल्याचे मुख्याध्यापक शांताराम कुलकर्णी यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारची ओढाताण न करता स्वत: वरील विश्वास सार्थ ठरवत झेंडू आणि तिच्या मैत्रिणीने मिळवलेले गुण सध्याच्या नकारात्मक वातावरण दिलासा देणारी बाब आहे.

यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुश्शार दरम्यान, कोरोनामुळे यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Result 2020) दहावीचा निकाल उशीरा जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. हेही वाचा… MSBSHSE SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, गुणपडताळणीसाठी इथे कराल ऑनलाइन अर्ज यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91% लागला असून मुलांचा निकाल 93.99% लागला आहे. विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 % लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात