Home /News /career /

MSBSHSE SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, गुणपडताळणीसाठी इथे कराल ऑनलाइन अर्ज

MSBSHSE SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, गुणपडताळणीसाठी इथे कराल ऑनलाइन अर्ज

निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी अनेक विद्यार्थ्यांची गडबड असते. दरम्यान सध्या ऑनलाइन पद्धतीने देखील गुणपडताळणी करता येणार आहे

  मुंबई, 29 जुलै : शाळकरी मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीचा निकाल आज जाही झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे. साधारण राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे निकाल उशीरा जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याती माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. गुणपडताळणीसाठी कुठे कराल ऑनलाइन अर्ज? निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी अनेक विद्यार्थ्यांची गडबड असते. दरम्यान सध्या ऑनलाइन पद्धतीने देखील गुणपडताळणी करता येणार आहे. ऑनलाईन निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी करता येते. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर (http://verification.mh- ssc.ac.in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना वेबसाइटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत त्याचप्रमाणे छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल एटीकेटी सुविधा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे 'एटीकेटी'ची सुविधा लागू राहील.
  कसा पाहायचा निकाल -News18 Lokmat वर जर विद्यार्थी निकाल पाहणार असतील तर त्यांना सर्वप्रथम दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. -SMS द्वारेही पाहता येणार निकाल- आपण बोर्डाकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलनंबरवरून आपला निकाल SMS द्वारे पाहू शकणार आहात. इतर संकेतस्थळांवर mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तिथे भेट दिल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. -त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: SSC, Ssc exam result

  पुढील बातम्या