जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Board 12th Result : 12 च्या निकालात पहिल्यांदाच असं घडलं, 'त्या' विद्यार्थ्यांना गुणच मिळणार नाहीत

Maharashtra Board 12th Result : 12 च्या निकालात पहिल्यांदाच असं घडलं, 'त्या' विद्यार्थ्यांना गुणच मिळणार नाहीत

12th exam

12th exam

Maharashtra Board 12th Result : बोर्डाच्या आजवरच्या निकालात असा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. आज दुपारी 2 वाजता News18Lokmat आणि महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. बोर्डाच्या आजवरच्या निकालात असा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. औरंगाबादमध्ये 372 पेपरमधील सेम हस्ताक्षर प्रकरण घोटाळ्यात विद्यार्थी निकाल ओव्हररायटिंगचा भाग वगळून जाहीर केला आहे. या प्रकरणात विद्यार्थी कुठेही सकृतदर्शनी दोषी आढळून आलेले नाहीत. त्यामुळे तो सेम हस्ताक्षराचा पार्ट वगळून निकाल जाहीर केला आहे.

Maharashtra HSC Result 2023 LIVE updates : या विभागाचा सर्वात कमी लागला निकाल, मुलं का पडली मागे?

या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद 372 पेपरमधील सेम हस्ताक्षर प्रकरण घोटाळ्यात विद्यार्थी निकाल ओव्हररायटिंगचा भाग वगळून जाहीर केला आहे. 375 प्रकरण पकडण्यात आली होती.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा प्रकरणातील संभाव्य प्रकरणांना आळा घालण्यासाठी 271 भरारी पथक कार्यरत होती. जिल्ह्यास्तरावर आपापली भरारी पथक कार्यरत ठेवली होती. यावर्षी गैरप्रकाराला आळा बसल्याचं दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पेपर घेऊन जाणाऱ्यांना परीक्षा हॉलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांना GPS द्वारे ट्रॅक केलं जात होतं. किती वाजता परीक्षा हॉलवर किती वाजता पोहोचले याचाही ट्रॅक ठेवला जात होता. त्यांचं लोकेशन ट्रेस केलं जात होतं. या सगळ्या गोष्टी असूनही कॉपीचे प्रकार, उत्तर पत्रिकेतील सारखं हस्ताक्षर असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर सारखं आढललं त्याचे मार्क विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत. ते वगळून उर्वरित उत्तरांवर मार्क देण्यात आले आहेत.

Maharashtra Board 12th Result : यंदाही बारावीच्या निकालात मुलींची बाजी

विभागवार 12 वीचा निकाल पुणे 93.34 नागपूर 90.35 औरंगाबाद 91.85 मुंबई 88.13 कोल्हापूर 93.28 अमरावती 92.75 नाशिक 91.66 लातूर 90.37 कोकण 96.01

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात