मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. यंदा बारावीचा निकाल 91. 25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल 2 टक्क्यांनी कमी झाला आहे. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षा मुलींना बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत यावर्षी मुलींचा निकाल 4 टक्क्यांनी जास्त आहे. कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे.
मुलींचा निकाल - 93.73 टक्के
मुलांचा निकाल- 89.14 टक्के
कोकण विभागाचा निकाल ९६.०१
मुंबई विभागाचा निकाल ८८.१३
गेल्या वर्षीचा विभागनिहाय निकाल
पुणे: 93.61%
नागपुर: 96.52%
औरंगाबाद: 94.97%
मुंबई: 90.91%
कोल्हापूर: 95.07%
अमरावती: 96.34 %
नाशिक: 95.03%
लातूर: 95.25%
कोकण: 97.21%
कुठे पाहायचा निकाल?
बारावीचा निकाल तुम्ही mahahsscboard.in, mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता. याशिवाय News18Lomat च्या साईटवरही निकाल पाहू शकता. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑनलाईन साईटवर mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. याशिवाय SMS द्वारे देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. मेसेज अॅपमध्ये जाऊन तुम्हाला "MHHSC" नंतर एक स्पेस टाइप करा. तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. तो टाइप करुन झाल्यावर 57766 SMS सेंड वर क्लिक करा. तुम्हाला निकाल SMS द्वारे कळवण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Career, Exam result, HSC Result, Maharashtra News, State Board