मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra Board 12th Result Declared: ऐन निकाल बघताना सर्व्हर डाऊन झालंय? टेन्शन नॉट; 'या' पद्धतींनी बघता येईल रिझल्ट

Maharashtra Board 12th Result Declared: ऐन निकाल बघताना सर्व्हर डाऊन झालंय? टेन्शन नॉट; 'या' पद्धतींनी बघता येईल रिझल्ट

सर्व्हर डाऊन झालंय? टेन्शन नॉट; 'या' पद्धतींनी बघता येईल रिझल्ट

सर्व्हर डाऊन झालंय? टेन्शन नॉट; 'या' पद्धतींनी बघता येईल रिझल्ट

Maharashtra Board 12th Result Declared: टेन्शन घेऊच नका. तुम्हाला तुमचा निकाल सर्वात आधी वेळेत बघायचा असेल तर या काही पद्धतीनं तुम्ही निकाल बघू शकणार आहात.

मुंबई, 25 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्ल्क आहेत. आज दुपारी 2 वाजता हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी लॅपटॉप, मोबाइलसमोर बसले आहेत. पण निकाल म्हंटलं की सर्वात टेन्शनची गोष्ट असते म्हणजे सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम. यापूर्वी अनेकदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल उशिरा बघता आले होते. पण आता टेन्शन घेऊच नका. तुम्हाला तुमचा निकाल सर्वात आधी वेळेत बघायचा असेल तर या काही पद्धतीनं तुम्ही निकाल बघू शकणार आहात.

बोर्डाचे निकाल म्हंटलं की सर्वच विद्यार्थ्यां एकाच वेळी वेबसाईट ओपन करतात आणि नको तेच होतं. अनेकदा निकालाच्या वेळी वेबसाईट क्रॅश झाली. यामुळे विदयार्थ्यांना संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत आपला निकाल बघण्यासाठी वाट बघावी लागली होती. यंदाही असाच प्रकार घडू नये म्हणून काही टिप्स जाणून घेऊया.

News 18 लोकमत थेट बघता येईल निकाल

बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे.

Maharashtra Board 12th Result 2023: राज्याचा एकूण निकाल इतके टक्के; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये

असा बघा तुमचा ऑनलाईन निकाल

सुरुवातीला News18 लोकमत च्या करिअर section मधील कोणतीही लिंक ओपन करा.

यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल.

यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.

यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.

यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.

Maharashtra HSC Result 2023 LIVE updates : कोकण अव्वल, तर तुमच्या विभागाची किती टक्केवारी? पाहा इथं

SMS पद्धतीनं बघा निकाल

महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑनलाईन साईटवर mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. याशिवाय SMS द्वारे देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. मेसेज अॅपमध्ये जाऊन तुम्हाला "MHHSC" नंतर एक स्पेस टाइप करा. तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. तो टाइप करुन झाल्यावर 57766 SMS सेंड वर क्लिक करा. तुम्हाला निकाल SMS द्वारे कळवण्यात येईल.

MH State Board 12th Result: फक्त News18 Lokmat वर दिसेल सर्वात वेगवान निकाल; इथे करा रजिस्टर

Incognito मोडमधून चेक करा निकाल

अनेकदा निकाल हा तुमच्या लॉग इन वरून ओपन होऊ शकत नाही. किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे लिंक ओपन होत नाही. अशा वेळी तुमच्या ब्राउझरच्या Incognito मोडमधून निकाल चेक करण्याचा प्रयत्न करा. अनेकदा या मोडमध्ये वेबसाईट ओपन होते आणि लगेच निकाल दिसतो.

First published:
top videos

    Tags: Exam result, HSC Result, Maharashtra Board Exam, State Board