मुंबई, 19 जानेवारी: आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. मेटा कंपनीने आपल्या सुमारे 13 टक्के कर्मचार्यांची हकालपट्टी केली आहे. बायजू आणि अनअॅकडमी या भारतीय शैक्षणिक स्टार्टअप्सनीसुद्धा अनेक कर्मचार्यांना काढून टाकलं आहे. अचानक नोकरी गमावणं ही बाब धक्कादायक असते. कारण, त्यामुळे तुमच्या भविष्यकालीन नियोजनामध्ये अडथळा येऊ शकतो. शिवाय, तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की एक जॉब गेला तरी तुम्हाला तुमची क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर दुसरा जॉब मिळवता येऊ शकतो. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सध्या सुरू असलेल्या कर्मचारी कपतीची झळ तुम्हालाही बसली असेल तर पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स वापरू शकता. Facebook म्हणजे फक्त टाईमपास नाही गड्यांनो, इथूनही मिळतात लाखो रुपये सॅलरीचे जॉब्स; या घ्या ट्रिक्स 1. तुमच्या गरजा समजून घ्या : तुम्हाला शॉर्ट नोटीसवर नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असेल तर तुम्ही शक्य तितक्या लवकर दुसरी नोकरी शोधणं सुरू केलं पाहिजे. नोकरी जाणं ही बाब नेहमीच वेदनादायक असते; पण त्यामुळे आपल्याला नेमकं काय हवं आहे याचा पुनर्विचार करण्याची संधीदेखील मिळते. नवीन नोकरीसाठी शोधण्याबरोबरच तुम्ही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुम्हाला पुन्हा कॉर्पोरेट नोकरी हवी आहे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे, याबाबत तुम्ही विचार करू शकता. 2. तुमच्या कामगिरीचं पुनरावलोकन करा : आधीच्या नोकऱ्यांमध्ये तुम्ही मिळवलेला अनुभव आणि तुम्ही आत्मसात केलेली कौशल्यं कधीही व्यर्थ जात नाहीत. नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीत काय मिळवलं आहे, याचा आढावा घ्या. त्याची कागदावर नोंद करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निराशेचा सामना करण्यास मदत होईल. तुम्हाला भविष्यातल्या मुलाखतींसाठी तयार करण्यातही ही बाब प्रभावी ठरू शकेल. MahaGenco Recruitment: महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी 3. स्वत:मध्ये सुधारणा करा : तुमची नोकरी किंवा रोजगार जाण्याचा तुमच्या क्षमतांशी काहीही संबंध नाही. तुम्ही कायम अशा पद्धतीने काम करायला हवं, की कोणीही तुम्हाला टाळू शकणार नाही. तुमचा रोजगार गमावण्याचा तुमच्या क्षमतेशी काही संबंध नसला, तरी एखाद्याने नेहमीच अपरिहार्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमची पुढची नोकरी मिळवण्याआधी तुमच्याकडे नसलेली कौशल्यं आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे पुढच्या कंपनीमध्ये तुम्ही एक चांगली पोझिशन मिळवू शकता. 4. सकारात्मक दृष्टिकोन : तुम्ही सकारात्मक मानसिकता घेऊन पुढच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. अचानक नोकरी जाणं हे अनेक कारणांमुळे वेदनादायक ठरू शकतं; पण काहीही झालं तरी पुढे वाटचाल करून संधी शोधणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कृतींचा अतिविचार करत असाल आणि आत्मपरीक्षण करत असाल, तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नोकरीच्या शोधातून थोडा वेळ काढून तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ व्यतीत करण्याचा किंवा तुमचा मूड चांगला होईल अशा गोष्टींत मन गुंतवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
5. ओळखींचा वापर करा : मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमुळे प्रभावित होणारे तुमच्यासारखे इतर अनेकजण असतील. तेदेखील नोकरीच्या शोधतात असतील. अशा वेळी स्पर्धा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या पूर्वीच्या सहकाऱ्यांशी बोला. तुम्ही एखाद्या संधीसाठी योग्य आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुमचं नेटवर्क वापरा. तसंच, नोकरी शोधताना तुमच्या पूर्वीच्या बॉसशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.

)







