मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

LIC Recruitment 2021: LIC मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

LIC Recruitment 2021: LIC मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

एलआयसी`नं नुकतीच पदभरतीसंदर्भात (Government Recruitment) अधिसूचना जारी केली आहे.

एलआयसी`नं नुकतीच पदभरतीसंदर्भात (Government Recruitment) अधिसूचना जारी केली आहे.

एलआयसी`नं नुकतीच पदभरतीसंदर्भात (Government Recruitment) अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : देशात कोरोना काळात अनेक क्षेत्रांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळे (Corona) लागू करण्यात आलेला लॉकडाउन आणि कडक निर्बंधांमुळे अनेकांच्या रोजगारावर प्रतिकूल परिणाम झाला. तसंच यामुळे अनेकांना आपली नोकरी किंवा रोजगार गमवावा लागला. परिणामी सध्या बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक सुशिक्षित, अनुभवी युवक नोकऱ्यांच्या शोधात आहेत. त्याचप्रमाणे नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले युवक-युवतीदेखील नोकरीच्या संधी शोधत आहेत. आर्थिक क्षेत्रात सातत्याने रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. कॉमर्स शाखेतून (Commerce Faculty) पदवी घेतलेल्या, तसंच आर्थिक क्षेत्राशी निगडित शिक्षण घेतलेल्या युवकांना या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरी हे अनेक युवक-युवतींचं स्वप्न असतं. यासाठी अनेक तरुण कठोर मेहनत करत असतात. अर्थविषयक शासकीय संस्थांमधूनही अशा युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC Recruitment 2021) हे देशातलं सर्वांत मोठे विमाविषयक महामंडळ आहे. `एलआयसी`नं नुकतीच पदभरतीसंदर्भात (Government Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. विमा क्षेत्राचा वाढता विस्तार बघता संबंधित शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते. त्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये करिअर करण्याचा विचार करत असलेल्या उमेदवारांना येथे नोकरीकरिता अर्ज करणं श्रेयस्कर ठरणार आहे.

जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर इथे जागा रिक्त

`एलआयसी`ने विमा सल्लागार अर्थात इन्शुरन्स अॅडव्हायझरच्या (Insurance Advisor) 100 पदांच्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी. भारतीय आयुर्विमा महामंडळ हे देशातलं वैधानिक विमा आणि गुंतवणूक महामंडळ आहे. या महामंडळावर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचं (Finance Ministry) नियंत्रण आहे. सुरक्षित आणि खात्रीशीर विमा संरक्षणासाठी आजही ग्राहक `एलआयसी`च्या विविध योजनांना प्राधान्य देताना दिसतात.

विमा सल्लागार पदासाठी इच्छुक उमेदवारांनी याकरिता नोंदणी करण्यापूर्वी भारतीय आयुर्विमा महामंडळाने जारी केलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अर्ज करण्यासाठी असलेल्या अंतिम मुदतीबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तसंच या पदांसाठी निवड झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना कामासाठी नवी दिल्ली येथे रुजू व्हावं लागणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात ज्या उमेदवारांची विमा सल्लागार म्हणून निवड केली जाईल, त्यांना 7 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे. त्यामुळे ही एक चांगली संधी असून, इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार विमा सल्लागार पदासाठी अर्ज दाखल करावा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, LIC, जॉब