मुंबई : जगात सध्या अत्यंत बिकट परिस्थिती आहे. एवढी बिकट की एकीकडे आर्थिक मंदीचे संकेत आहेत. यासोबत कोरोनाचं संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही, तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धाला अजूनही पूर्णविराम लागला नाही. चीनमध्ये पुन्हा कोरोना फोफावत आहे. अनेक मोठ्या देशांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये बड्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
काही कंपन्यांनी तर अगदी 20 हजार कर्मचारी रातोरात काढले आहेत. जवळपास अमेरिकेत 2 लाखहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामध्ये गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ट्वीटर सारख्या बड्या कंपन्यांची नाव देखील आहेत.
आता याचे परिणाम आणि पडसाद भारतात कसे उमटणार हा प्रश्न अनेकांना आहे. भारताबाहेर एवढ्या नोकऱ्या जात असताना आता भारतीय नागरिकांच्या नोकऱ्या किती सुरक्षित आहेत यावर काही तज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार आणि तज्ज्ञांच्या मते भारतात एवढी गंभीर स्थिती सध्यातरी नाही. परदेशापेक्षा लेबर कॉस्ट आणि इंफ्रास्ट्रक्चर कॉस्टमध्ये इथे फरक आहे. रुपयामध्ये ज्यांना पगार मिळतो त्यांच्यावर टांगती तलवार कमी आहे असं म्हणायला हवं.
कोरोनामुळे डिजिटलायझेशन वाढलं त्यामुळे बँकिंग सेक्टर आणि डिजिटल मीडियासाठीच्या जागा निघाल्या आहेत. सध्याची एकूण स्थिती पाहता भारताची स्थिती फार वेगळी आणि हटके आहे. हा काळ शॉर्टटममध्ये आहे. त्यामुळे त्याचा फार मोठा फरक पडणार नाही.
आता 'ही' कंपनीही 3,900 कर्मचाऱ्यांना देणार नारळ, कारणही सांगितले
या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
तुम्ही तुमच्यातले कौशल्य ओळखा, बदलत्या ट्रेन्डनुसार आपल्या कामातही बदल करणं आवश्यक आहे. स्मार्ट वर्क करायला हवं. वेळेनुसार पुढे जाण्याची आवश्यकता आहे. नवीन स्कील्स शिकण्याकडे भर द्या. अमेरिकेसारखी स्थिती भारतात होणार नाही, भारतातील स्थिती वेगळी आहे याचा अर्थ अगदीच बिनधास्त राहावं असंही नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
मंदीच्या काळात अचानक नोकरी गेली? टेन्शन घेण्याची गरजच नाही; असा लगेच मिळेल दुसरा जॉब
कोणत्या सेक्टरला बसू शकतो फटका
IT, स्टार्टअप, ओव्हर हायरिंग करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअपला फंडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही स्थिती तात्पुरती आहे. त्यामुळे हा काळही जाईल फक्त यामध्ये टिकणं महत्त्वाचं आहे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांनी खचून जाऊ नये, नवीन सेक्टर ट्राय करायला हवेत. नोकऱ्या आताही आहेत आणि त्या कमी आधीक असणार आहेत
कोणत्या गोष्टी करायला हव्या
स्वत:वर विश्वास ठेवा,
नोकरी गेल्यानंतर स्वत:ला कमी लेखू नका
आत्मविश्वास कमी पडू देऊ नका
मानसिक आरोग्य चांगलं राहील यावर लक्ष द्या
कर्जाच्या फेऱ्यात अडकू नका
नेटवर्किंगवर लक्ष द्या
नव्या सेक्टरमध्ये तुम्ही नोकरीसाठी लक्ष केंद्रीत करू शकता
यासाठी तुमच्या स्कील्सवर सातत्याने काम करत राहा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.