• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती; या लिंकवर आजच करा अप्लाय

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती; या लिंकवर आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    रत्नागिरी, 25 ऑक्टोबर: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या 139 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Konkan Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice) एकूण जागा - 139 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त म्हजविद्यालयातून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर इथे परीक्षा न देता नोकरीची संधी तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice) - या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त म्हजविद्यालयातून डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय 18-25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. इतका मिळणार Stipend ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी - 4984/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमा उमेदवारांसाठी - 3542/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2021 Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी
    JOB ALERT  Konkan Railway Recruitment 2021
    या पदांसाठी भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) तंत्रज्ञ अप्रेंटिस (Technician Apprentice) एकूण जागा - 139
    शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंगच्या फिल्डमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक
    वयोमर्यादा या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय 18-25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.
    इतका मिळणार Stipend ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी - 4984/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमा उमेदवारांसाठी - 3542/- रुपये प्रतिमहिना
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://konkanrailway.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: