जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान Mental Health वरही द्या लक्ष; चांगले मार्क्स मिळवण्यासाठी होईल फायदा

विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान Mental Health वरही द्या लक्ष; चांगले मार्क्स मिळवण्यासाठी होईल फायदा

4. अभ्यासाच्या खोलीच्या ईशान्येला देवी सरस्वतीचे चित्र लावावे. कारण, देवी सरस्वती ही ज्ञान, कला आणि संगीताची देवता आहे.

4. अभ्यासाच्या खोलीच्या ईशान्येला देवी सरस्वतीचे चित्र लावावे. कारण, देवी सरस्वती ही ज्ञान, कला आणि संगीताची देवता आहे.

आज आम्ही तुम्हाला तुम्हला अशा काही टिप्स (Tips to be calm during Exam) देणार आहोत ज्यामुळे तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील आणि अभ्यासही चांगला होईल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 मार्च: दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Maharashtra state board exams 2022) जवळ येऊ लागल्या आहेत. परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे आणि शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड ताण (stress in board exams) असणार आहे. काही समजलं नाही, हा प्रश्न येत नाही, अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांसमोर असणार आहेत. परीक्षा (Exam Tips in Marathi) म्हंटले की विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड ताण येतोच. नक्की कोणता विषय करायचा याबाबत विद्यार्थ्यांना भीती वाटते. मात्र या तणावामुळे विद्यार्थ्यांना (Exam Preparation Tips) नुकसान सहन करावं लागू शकतं. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मेंटल हेल्थ (Maintain mental health during exam) चांगली ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुम्हला अशा काही टिप्स (Tips to be calm during Exam) देणार आहोत ज्यामुळे तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील आणि अभ्यासही चांगला होईल. चला तर मग जाणून घेऊया. या मार्गांनी स्वतःला फिट ठेवा परीक्षेदरम्यान, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी, तुमचे खाणे-पिणे आणि व्यायामाचा दिनक्रम निश्चित करा. जाणून घ्या काही टिप्स, ज्याद्वारे परीक्षांच्या कठीण काळात मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवता येते’ Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यास करून प्रचंड कंटाळा आलाय? मग असे व्हा Refresh या टिप्स करा फॉलो अभ्यास केल्यानंतर दर अर्धा किंवा एक तासाने ब्रेक घ्या. या दरम्यान एका जागी बसण्याऐवजी थोडे इकडे तिकडे चाला.तसंच एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी नित्यक्रमात ध्यान किंवा व्यायामाचा समावेश करा. अनावश्यक विचलनापासून स्वतःला दूर करा. सोशल मीडियापासून दूर राहा आणि पार्टी वगैरे काही काळ विसरा. अभ्यासाच्या सुट्टीत संगीत ऐका, मैदानी खेळ खेळा, नृत्य करा किंवा तुमच्या छंदाला वेळ द्या. या काळात टीव्ही पाहू नका. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल. तणावाशिवाय अभ्यास करा परीक्षेच्या काळात बहुतेक विद्यार्थी अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होतात. पण परीक्षेची तयारी करताना घाबरून (how to do stress free study) जाण्यापेक्षा शांत राहणे चांगले आणि फक्त अभ्यासाचा विचार करून त्यावर लक्ष केंद्रित करणे. अस्वस्थतेमुळे, अभ्यासातून लक्ष काढून टाकले जाते. यावेळी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि शक्यतो तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. या काळात सकारात्मक राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam , Exam , tips
  • First Published :
जाहिरात
जाहिरात