जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यास करून प्रचंड कंटाळा आलाय? मग असे व्हा Refresh; फॉलो करा Tips

Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यास करून प्रचंड कंटाळा आलाय? मग असे व्हा Refresh; फॉलो करा Tips

पहाटे अभ्यास करण्यासाठी नक्की जाग येईल.

पहाटे अभ्यास करण्यासाठी नक्की जाग येईल.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to be fresh during Exams) देणार आहोत ज्यामुळे परीक्षेदरम्यान रिफ्रेश होता येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 मार्च: परीक्षा म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या मनात सतत अभ्यास अभ्यास (Study during exams) असतो. यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा मानसिक ताण (tension during exam) निर्माण होऊ शकतो. मग परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसतसे अभ्यासाचे तास वाढू लागतात. मात्र सतत एकाच ठिकाणी बसून अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर, शरीरावर आणि मेंदूवर परिणाम (How to avoid tension during Exams) होऊ शकतो. म्हणूनच अभ्यासाच्या दरम्यान काही काळ ब्रेक्स (How to refresh yourself during Exams) घेणं आवश्यक आहे. मात्र, या वेळात करणार काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to be fresh during Exams) देणार आहोत ज्यामुळे परीक्षेदरम्यान रिफ्रेश होता येईल. यामुळे तुमची परीक्षाही उत्तम जाईल. काही वेळ विश्रांती घ्या आपण अभ्यास करताना आपले डोळे आणि मेंदू हे सतत काम करत असतात. त्यामुळे आपल्याला प्रचंड झोप येते. सतत डुलक्या आल्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येऊ शकतात. म्हणूनच अभ्यासादरम्यान घेतलेल्या ब्रेक्समध्ये १०-१५ मिनिटं झोप घ्या आणि त्यानंतर फ्रेश होऊन परत अभ्यासाला बसा. यामुळे तुमचं लक्ष अभ्यासात राहील आणि तुमचा मेंदू पुन्हा नव्या दमानं काम करेल. Exam Tips: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षांसाठी नेमका कसा करावा अभ्यास? वाचा तुमचे छंद जोपासा प्रत्येकाला काही ना काही छंद असतोच. परीक्षांच्या काळात अभ्यास करून आपला मेंदू आणि आपलं शरीर थकून जातं. त्यामुळे रिफ्रेश होण्यासाठी तुमचे छंद तुम्हाला मदत करू शकतात. अभ्यासाच्या दरम्यान घेतलेल्या ब्रेक्समध्ये आपले छंद जोपासा. चित्र काढा, पेंटिंग करा, गाणं म्हणा, कुठला गेम खेळा असं काही केल्यामुळे तुमचं शरीर आणि मेंदू रिफ्रेश होईल आणि तुम्ही पुन्हा नव्या जोमानं अभ्यास करू शकाल. आंघोळ करा अभ्यासाला बसताना आपण साधारणतः आंघोळ करतोच. मात्र एकाच जागी भरपूर वेळ अभ्यास करत बसल्यामुळे शरीर आणि मेंदूवर ताण येतो. म्हणूनच अभ्यास करताना ब्रेक घेतल्यानंतर १०-१५ मिनिटांत पुन्हा आंघोळ करा. यामुळे तुमच्या मेंदूला आणि शरीराला शांतता मिळेल आणि रिफ्रेश होऊ शकाल. फेरफटका मारून या आपल्याला सतत एका जागी बसून राहता येत नाही. सतत एका जागी बसून अभ्यास केल्यामुळे काही काळानंतर आपला मेंदू थकतो आणि वाचलेली उत्तरं लक्षात राहत नाहीत. म्हणूनच सतत एकाच जागी बसून भरपूर वेळ अभ्यास करण्यापेक्षा काही वेळ बाहेर जाऊन फेरफटका मारून या. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह शांत होईल आणि तुमचा मेंदूही शांत होईल. तसंच तुम्हाला फ्रेश वाटेल. व्यायाम करा अभ्यास केल्यामुळे तुमचं शरीर अकडू शकतं. तसंच तुमच्या स्नायूंनाही त्रास होऊ शकतो. म्हणूनच काही वेळ स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमचं अकडणार नाही. तसंच तुमच्या स्नायूंनाही स्ट्रेचिंगमुळे बळ मिळेल. यामुळे तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर रिलॅक्स होईल. मेडिटेशन करा तुमच्या अभ्यासातील ब्रेक्समध्ये तुमचं मन आणि तुमच्या मेंदूला शांत आणि रिलॅक्स ठेवण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. हा एक सर्वात चांगला आणि सोपी उपाय आहे. मेडिटेशन करताना डोळे बंद करून शांतपणे मांडी घालून बसा. यादरम्यान तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. असं काही वेळ केल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. तसंच तुमचं मन आणि तुमचा मेंदू रिफ्रेश होईल. बारावीची उद्यापासून परीक्षा, दोन पेपरची तारीख पुढे ढकलली, वाचा नवं वेळापत्रक काही खाऊन घ्या अनेकदा आपल्याला भूक लागल्यामुळे आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तसंच अभ्यास करताना ब्लड शुगर कमी होऊ शकते. म्हणूनच अभ्यासादरम्यान घेतलेल्या ब्रेक्समध्ये काही खाऊन घ्या. ज्यामुळे तुमची ब्लड शुगर स्थिर राहील. तसंच तुमचं संपूर्ण लक्ष अभ्यासात लागेल. मात्र काही खाताना तुमच्या शरीरास उपयुक्त असेच पदार्थ खा. जंक फूडपासून दूर राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात