मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: पर्यावरण आणि ग्रीन सेक्टरमध्ये आहेत करिअरच्या अनेक संधी; कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल माहिती

Career Tips: पर्यावरण आणि ग्रीन सेक्टरमध्ये आहेत करिअरच्या अनेक संधी; कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल माहिती

ग्रीन सेक्टरमधील करिअर टिप्स

ग्रीन सेक्टरमधील करिअर टिप्स

आज आम्ही तुम्हाला भारतातील ग्रीन सेक्टरमधील शिक्षणाच्या (Education in Green Sector India) काही संधी आणि कॉलेजबद्दल माहिती देणार आहोत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट:   आजकालच्या काळात पर्यावरण टिकवून ठेवणाऱ्यांपेक्षा पर्यावरणाचा ऱ्हास करणारे लोक अधिक आहेत. झाडं, फुलं, पाणी, अन्न, हवा या सर्वांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखं भयंकर संकट पृथ्वीसमोर आहे. म्हणूनच आज प्रत्येक देश ग्रीन सेक्टरवर (How to make career in Green Sector) काम करतो आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता बचाव करण्याचं काम करत आहे. म्हणूनच भारताच्या ग्रीन सेक्टरमध्ये करिअरच्या अनेक संधी  उपलब्ध झाल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारतातील ग्रीन सेक्टरमधील शिक्षणाच्या (Education in Green Sector India) काही संधी आणि कॉलेजबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

ग्रीन सेक्टरमधील काही कोर्सेस

आपल्या देशात,ग्रीन सेक्टर किंवा पर्यावरण क्षेत्राशी संबंधित कोणताही शैक्षणिक अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून विज्ञान प्रवाहात 12वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तरुणांनो तयार राहा! देशात 'या' सेक्टरमध्ये उपलब्ध होणार तब्बल 10 लाख नोकऱ्या; राज्यातही पडणार जॉब्सचा पाऊस

B.Sc/ BE/ B.Tech – पर्यावरण विज्ञान – विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून विज्ञान प्रवाहात 12वी उत्तीर्ण केलेली असावी. या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षांचा आहे. त्याचप्रमाणे, या क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत असू शकतो.

MSc / ME / MTech- पर्यावरण विज्ञान – विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून विज्ञान प्रवाहात पदवी पूर्ण केलेली असावी.  या अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा आहे.

एमफिल – पर्यावरण विज्ञान – विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली पाहिजे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे.

पीएचडी – पर्यावरण विज्ञान – विद्यार्थ्यांकडे एमफिल पदवी असणे आवश्यक आहे आणि या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 ते 5 वर्षे आहे.

फ्रेशर्ससाठी IMP बातमी! मनात येईल तेव्हा Resume सेंड करू नका; 'ही' असते कंपनीला CV पाठवण्याची योग्य वेळ

कोर्सेस ऑफर करणारे काही कॉलेजेस

दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

टेरी स्कूल ऑफ अॅडव्हान्स स्टडीज, नवी दिल्ली

भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बंगलोर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई/खड़गपूर

भारतीय वन्यजीव संस्था, उत्तरांचल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ/ मुंबई/ खरगपूर/ दिल्ली/ रुरकी/ कलकत्ता/ बंगलोर

First published:

Tags: Career, Career opportunities, Environment