मुंबई, 30 जून : आजकालच्या आधुनिक काळात महिलांसोबतच पुरुषांनाही स्टायलिश
(Stylish cloths)आणि चांगले कपडे घालायला आवडतात. त्यात सध्याच्या फॅशन ट्रेंड्सबरोबर
(Fashion Trends) आपले कपडे असतील तर पर्वणीच. अनेक जण स्वतःच्या फॅशन डिझायनरकडून
(Fashion Designer jobs) कपडे आपल्या आवडीनुसार आणि फॅशन ट्रेंडनुसार शिवून घेतात. म्हणूनच फॅशन डिझायनिंग क्षेत्राला मागणी वाढत चालली आहे. मोठमोठ्या सेलीब्रिटीजचे कपडे डिझाईन करण्याची संधी या क्षेत्रात मिळू शकते. आज आम्ही या क्षेत्रात काही शिकणं घेण्यापासुन ते करिअरच्या
(Career in Fashion designing) संधींपर्यंत सर्व गोष्टींची सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
शिक्षण
नामांकित संस्थेकडून फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी मूलभूत पात्रता निकष म्हणजे बारावी पास असणं. 10 + 2 उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन प्रकारचे कोर्स करू शकता. एक म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री
(Bachelor in Fashion Technology) आणि फॅशन डिझायनिंगमध्ये बॅचलर डिग्री
(Bachelor in Fashion Designing). तुम्ही तुमच्या आवडीनुसार यातील कोणताही अभ्यासक्रम करु शकता. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी 4 वर्ष आहे.
अंगी हे गुण असणं आवश्यक
चांगली कल्पनाशक्ती शक्ती असणे आवश्यक आहे.
आपल्याकडे एक उत्कृष्ट कलाकृती तयार करण्यासाठी फॅब्रिक्स, रंग आणि शैली जुळविण्यासाठी आर्टिस्टिक व्यू असणं आवश्यक आहे.
व्हिज्युअलायझेशन क्षमता असणं आवश्यक आहे.
फॅशन टेस्ट आणि नवीनतम फॅशन ट्रेंडसह अपडेटेड असणं आवश्यक आहे.
हे वाचा -
Career Point: Advertising क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी; बघा संपूर्ण माहिती
हे आहेत टॉप कॉलेजेस
सीईपीझेड इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मुंबई
जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (नवी दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, गांधीनगर)
पर्ल अकॅडमी ऑफ फॅशन, नवी दिल्ली
नोकरीच्या संधी
टॅलेंटेड फॅशन डिझायनरला अपिअरल कंपनीमध्ये, एक्सपोर्ट हाउसमध्ये किंवा रॉ मेटीरियल इंडस्ट्रीमध्ये स्टाइलिस्ट किंवा डिज़ाइनर म्हणून नोकरी मिळू शकते. तसंच यामध्ये स्वतःचं बुटीक सुरु करूनही व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.