मराठी बातम्या /बातम्या /करिअर /12वी उत्तीर्णांनो, Infosys कंपनीत तुमच्यासाठी Internship ची मोठी संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अप्लाय

12वी उत्तीर्णांनो, Infosys कंपनीत तुमच्यासाठी Internship ची मोठी संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अप्लाय

Infosys

Infosys

हा कंपनीचा CSR उपक्रम असल्याने, विद्यार्थ्यांना कोणतेही स्टायपेंड दिले जाणार नाहीये.

मुंबई, 28 डिसेंबर: देशात सध्या IT कंपन्या आणि IT क्षेत्रातील नोकऱ्यांची (Jobs in IT sector) चर्चा आहे. IT क्षेत्रात हजारो नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बारावी उत्तीर्णांसाठी (Internship for 12th pass) नामांकित IT कंपनी Infosys नं इंटर्नशिपची (Infosys Internship) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने सुरू केलेल्या स्प्रिंगबोर्ड उपक्रमाचा (Springboard program) भाग म्हणून नुकतेच १२वी उत्तीर्ण झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिस इंटर्नशिप आयोजित केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप प्रोग्राम (Infosys Springboard internship Program) हे विद्यार्थी किंवा शिकणार्‍यांसाठी शिकण्याची एक उत्तम संधी आहे जे त्यांच्या सध्याच्या कौशल्यांचा विकास करू पाहत आहेत आणि जागतिक कॉर्पोरेट व्यावसायिकांसारखे बनण्याची तयारी करत आहेत. ही इंटर्नशिप जमशेदपूर इथे असणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकलेले सैद्धांतिक ज्ञान व्यावहारिक कार्यात कसे लागू करावे याबद्दल इन्फोसिस तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. इन्फोसिस इंटर्नशिप कार्यक्रम (Infosys Springboard internship Program) आयोजित केला जात आहे आणि हा कंपनीचा CSR उपक्रम असल्याने, विद्यार्थ्यांना कोणतेही स्टायपेंड दिले जाणार नाहीये.

गोल्डन चान्स! DRDO मध्ये Research Fellowship साठी भरती; 31,000 रुपये Stipend

विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 8 ते 12 आठवड्यांची ही इंटर्नशिप असणार आहे. या इंटर्नशिप कार्यक्रमात मर्यादित जागा आहेत, त्यामुळे परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे कंपनी उमेदवारांची निवड करू शकते.

इंटर्नशिपसाठी ही पात्रता आवश्यक

अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष आणि पदवी किंवा पूर्ण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.

अर्जदारांना प्रकल्पाच्या विषयासाठी सुचविलेले सर्व पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे आणि अभ्यासक्रमांच्या स्वयं-मूल्यांकन परीक्षांमध्ये 60 टक्के मिळवणे देखील आवश्यक आहे.

अर्जदारांना एक सर्व्हे फीडबॅक देखील सबमिट करणे आवश्यक आहे जे त्यांनी अर्ज बटणावर क्लिक केल्यावर सक्रिय होईल.

MPSC परीक्षेत निबंध लिहण्यासाठी काय तयारी करावी?

इन्फोसिस इंटर्नशिपसाठी असा करा अर्ज

ज्यांना अर्ज सादर करायचे (How to apply for Infosys Springboard internship Program) आहेत त्यांनी अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.. इन्फोसिस इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रथम स्प्रिंगबोर्ड वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

इच्छुक सहभागींना 14 जानेवारी 2021 पूर्वी वेबसाइटवर दिलेल्या प्रोजेक्ट्सच्या सूचीमधून एक प्रोजेक्ट निवडावा लागेल.

सर्व पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांद्वारे घेतलेल्या कोणत्याही मुलाखतीसाठी देखील तयार असणे आवश्यक आहे.

मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांनाप्रोजेक्ट्सचे वाटप केले जाईल.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब