मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSC परीक्षेत निबंध लिहण्यासाठी काय तयारी करावी? लेखनसाठी पिरॅमिड रचना का महत्वाची?

MPSC परीक्षेत निबंध लिहण्यासाठी काय तयारी करावी? लेखनसाठी पिरॅमिड रचना का महत्वाची?

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Essay plays an important role in MPSC exam: एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत निबंध लेखनाला खूप महत्व आहे. त्यामुळे निबंध लिहताना तो कसा लिहावा? त्याची रचना कशी असावी? वेळेचे नियोजन कसे करावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात. निबंधाचा आकार पिरॅमिडसारखा (Pyramid) असावा असे का म्हणतात? चला तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊ.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 28 डिसेंबर : एमपीएससी परीक्षेत (mpsc exam preparation) निबंध लेखन (Essay Writing) हा खूप महत्वाचा विषय झाला आहे. निबंधातून विद्यार्थ्यांची तार्कीक विचारक्षमता आणि विश्लेषणात्मक ताकद जोखणे हा आयोगाचा उद्देश आहे. अभ्यासाद्वारे तर्क आणि विश्लेषण यावर आधारित स्वत:ची विचारप्रक्रिया जागी करून निबंध लेखनामध्ये ती रूपांतरीत करणे गरजेचे आहे. निबंधातून विद्यार्थ्यांच्या विचाराची समग्रता, तार्कीकता, विश्लेषणक्षमता आणि मुद्देसूद लेखन कौशल्य जाणवायला हवे. निबंधाची मुख्य कसोटी आपण लिहलेल्या निबंधाची रचना कशी आहे? यावरून होते. चला मित्रांनो आज याच संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात.

नागरी सेवा मुख्य परीक्षेतील निबंधाच्या अनिवार्य प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने 250 गुणांसाठी दोन निबंध लिहिणे अनिवार्य केलं आहे. त्या अंतर्गत एक निबंध अमूर्त तत्त्वविचारावर आणि दुसरा वर्तमान घडामोडींवर बेतलेला आहे. या दोन्ही निबंधाला प्रत्येकी चार पर्याय दिलेले असल्याने निवडीला वाव आहे. प्रत्येक निबंध विषयास किमान शब्दमर्यादा एक हजार असून ही प्रश्नपत्रिका लेखी चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण झाली आहे.

दोन प्रकारचे निबंध Types of Essay in mpsc

पहिल्या प्रकारच्या निबंधातून विद्यार्थी एखाद्या तत्त्वविचाराचा अमूर्त (abstract) पातळीवर कसा विचार करतो तसेच संबंधित तत्त्वविचार समाजजीवनाच्या विभिन्न क्षेत्रांशी कसा जोडतो याची चाचपणी केली जाते. तत्त्वविचारांवर आधारलेल्या निबंधाचा लाभ सामान्य अध्ययनाच्या पेपर 4 मधील नीती, सचोटी, तत्त्वज्ञान आणि अभिवृत्ती या अभ्यास घटकांना होतो. दुसऱ्या निबंधाद्वारे विद्यार्थ्यांचे समकालीन घडामोडीचे आकलन, बहुपदरी आणि खोलवर आहे का, याची चाचणी केली जाते. निबंध लेखनात वर्तमान घडामोडींवर प्रक्रिया करून तिचे विभिन्न आयाम उलगडून दाखविण्याची क्षमता विकसित करावी लागते.

निबंधाची रचना कशी असावी? structure of the essay in mpsc

निबंधाचा आकार एक प्रकारे पिरॅमिडसारखा (Pyramid) आहे. त्याचा खालचा भाग रुंद असतो, जो हळूहळू वरच्या दिशेने अरुंद होत जातो. हा 'लॉ ऑफ नेचर' म्हणजेच निसर्गाचा सिद्धांत आहे. या तत्त्वानुसार जी काही रचना उभारली जाईल, ती पिरॅमिड्ससारखी कायमस्वरूपी भक्कम असते. निबंधाची रचनाही याच प्रकारे करायची आहे. प्रथम आपण निबंधाची पायाभरणी केली पाहिजे. ही भूमिका थोडीशी असली तरी याला 'स्थापना' म्हणणे उचित ठरेल. थेट तुमच्या मुद्द्यावर येणे हा उथळपणा असतो. तुमच्या घरी पाहुणा आल्यावर त्याला जेवणाचं ताट वाढू का? असं विचारलं तर कसं वाटेल? साहजिक तुम्ही आधी काहीतरी बोलाल, प्रवास कसा झाला वैगेरे.. इथही हाच नियम वापरायचा.

विषयाचा पाया रचल्यानंतर आता तुम्हाला त्याच्यावर एक रचना तयार करावी लागेल. रचना अशा प्रकारे केली जाईल की तुम्ही तुमचे मुद्दे तुलनेने तपशीलवार ठेवण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकता. मात्र, लक्षात ठेवा की हा तपशील तुमच्या मूळ विषयापासून दूर जाऊ नये.

घरी राहून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करुन होऊ शकता अधिकारी! पण 'हे' पाळावं लागेल

विषय भरकटता कामा नये

निबंध लेखन करताना भावनिक होऊन लेखन करू नये. लिखाणात पोकळ आदर्शवाद मांडू नये. संदर्भाशिवाय विधान करू नये. अवाजवी कल्पना करणे टाळावे. विद्वानांची ढोबळ मते उद्धृत करू नयेत. सुविचार किंवा सुभाषिते वारंवार लिहू नयेत. गुंतागुंतीची वाक्यरचना करू नये. भाषेच्या चुका टाळाव्यात. निबंध लेखनातून आपल्याला संपूर्ण सत्य समजले आहे, अशा आग्रहाचे लेखन करू नये. निबंध हा भाषणप्रकार नसून तो विषयाचे पृथक्करण आणि विश्लेषण करणारा असतो. असं केल्याने आपली रचना विस्कळीत होऊ शकते. याला एक प्रकारचा "अनियंत्रित प्रलाप" म्हणता येईल, ज्याला निबंध लेखनाचे वेड आणि एक मोठी कमजोरी मानली जाते. विषय मांडताना सूट घ्या, पण विषय भरकटता कामा नये.

शेवटाला येताना मुद्दे ठोसपणे मांडा

आता जसजसा तुमचा निबंध पुढे जाईल, तसतसे तपशीलवार आणि सविस्तर लेखनात हात आखडता करा. तथ्यं मांडण्यास सुरुवात करा. मात्र, हे करताना त्यातील रस कमी होऊ देऊ नका. वरच्या दिशेने जाण्याच्या या प्रक्रियेत आता निबंध हळूहळू टोकदार होत चालला आहे, हे लक्षात असुद्या. तुम्ही जे काही सांगण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुम्ही तुमच्या बाजूने हळूहळू सिद्ध करत आहात. सविस्तर सांगण्याऐवजी तुमचे मुद्दे ठोसपणे मांडत आहात. असे केल्याने या भागाचा निबंध आपोआप पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल.

पहाटे अभ्यास करण्यासाठी नक्की जाग येईल

निष्कर्ष महत्वाचा

निबंधाचा अंतिम भाग हा तुमच्या निष्कर्षाचा भाग असेल. तुम्ही जे काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात, ते या शेवटच्या भागात असेल. होय, हा निष्कर्ष केवळ एका परिच्छेदात असावा असे समजू नका. त्याला किती परिच्छेद आवश्यक आहेत हे निष्कर्षावर अवलंबून आहे. जितके निष्कर्ष आहेत तितके परिच्छेद असणे चांगले. पण एकूण संरचनेच्या दृष्टिकोनातून, निष्कर्ष फार मोठा नसावा इतका संयम बाळगणे चांगले. त्यामुळे निबंधाचा पोत घट्ट होऊन त्याचा परिणाम चांगला होतो. वाचक पिरॅमिडच्या टोकाला येईपर्यंत आपला विषय त्याला पूर्णपणे समजून तो निष्कर्षापर्यंत पोहचला पाहिजे.

कॉलेजला असताना MPSC चा अभ्यास कसा करायचा?

वेळचे नियोजन Time Management

लेखी चाचणीमध्ये निबंध लेखनास तीन तासांचा कालावधी दिलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी वेळेच नियोजन फार महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे एका निबंधाला दीड तास वेळ उपलब्ध होतो. त्यापकी प्रत्येकी एका निबंधाला 20 मिनिटे राखीव ठेवून त्याचा कच्चा मसुदा तयार करावा. काढलेल्या मुद्द्यांची नीट रचना आखावी. त्याला समान लय प्रदान करावी. अशा प्रकारच्या नियोजनातून दिलेल्या वेळेत निबंध वेळेत पूर्ण करण्यास मदत होते.यासाठी भरपूर वाचनासोबत लेखनाची सवय असावी. लिहण्याचा वेग वाढल्यानंतर अक्षर खराब होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल. यासाठी नियमित लिहण्याचा सराव आवश्यक आहे.

First published:

Tags: Exam, Mpsc examination