• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • विद्यार्थ्यांनो, Aerospace इंजिनीअरिंग करायचं म्हणताय? मग इथे मिळेल कॉलेजपासून शिक्षणापर्यंत संपूर्ण माहिती

विद्यार्थ्यांनो, Aerospace इंजिनीअरिंग करायचं म्हणताय? मग इथे मिळेल कॉलेजपासून शिक्षणापर्यंत संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण आणि करिअर कसं करणार याबाबत माहिती देणार आहोत

  • Share this:
    मुंबई, 04 जुलै: इलेक्ट्रिकल, (Electrical) मेकॅनिकल (Mechanical), सिव्हिल (Civil) आणि कम्प्युटर (Computer Engineering) इंजिनीरिंगप्रमाणेच सध्या इंजिनिअरिंगच्या अजून एका ब्रांचला प्रचंड महत्त्वं प्राप्त होतंय. ती ब्रांच म्हणजे एरोस्पेस इंजिनीरिंग (Aerospace Engineering). या ब्रांचकडे विद्यार्थ्यांचा कल सध्या वाढतच चालला आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये (Education and Career in Aerospace Engineering) शिक्षण आणि करिअर कसं करणार याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. एरोस्पेस इंजिनिअरिंग नक्की आहे तरी काय? एरोप्सेस इंजिनिअरिंग (Aerospace Engineering). हे पूर्णतः डिझाईनिंगवर अवलबूंन आहे. विमान, एअरक्राफ्ट , सॅटेलाईट किंवा मिसाईल डिझायनिंगच काम करणे म्हणजे एरोस्पेस इंजिनिअरिंग. यात विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असतात. हे शिक्षण असणं आवश्यक एरोस्पेस इंजिनिअरिंग करण्यासाठी बारावीमध्ये सायन्स स्ट्रीममधून शिक्षण घेणं आवश्यक आहे. तसंच फीजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स हे विषय असणं आवश्यक आहे. एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी  सर्वात आधी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम (Entrance Exam) देणं आवश्यक आहे. JEE मेन, JEE Advanced, BITSAT, SRMJEEE, VITEEE, AEEE, VTUEEE, GATE यापैकी कोणतीही प्रवेश परीक्षा पास करणं महत्त्वाचं आहे. हे वाचा -राशीनुसार निवडा तुमचे करिअर, हे आहेत सर्वोत्कृष्ट पर्याय हे आहेत टॉप कॉलेजेस फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमी, सिकंदराबाद व्हीएसएम इंस्टिट्यूट ऑफ एरोस्पेस अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, बंगलोर जया अभियांत्रिकी महाविद्यालय, तिरुवल्लूर हिंदुस्तान तंत्रज्ञान संस्था, कोयंबटूर (तमिळनाडू) भारत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (बीआयईटी), हैदराबाद राजस्थान तंत्रज्ञान व अभियांत्रिकी विज्ञान कोटा वैमानिकी व सागरी अभियांत्रिकी संस्था, बंगळुरू (कर्नाटक) हिंदुस्तान अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (एचआयईटी), चेन्नई गुरू ग्राम इंस्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, नागपूर भारतीय वैमानिकी अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे (महाराष्ट्र) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजीनियरिंग, देहरादून पार्क कॉलेज ऑफ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कोयंबटूर हे वाचा -विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स या आहेत करिअरच्या संधी एरोस्पेस इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील संस्थानांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता असते. विमान कंपन्या (Airlines) हवाई दल (Air Force) हेलिकॉप्टर कंपन्या (Helicopter companies) संरक्षण मंत्रालय (Ministry of Defense) क्षेपणास्त्र (Missiles) अवकाशयान (Spacecraft)
    Published by:Atharva Mahankal
    First published: