मुंबई, 25 सप्टेंबर: Interview ला जाताना आपल्या डोक्यात कशाचा अभ्यास करून जाणार, काय बोलणार, कसं वागणार अशा बऱ्याच गोष्टी असतात. मात्र या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या कपड्यांवर किंवा ड्रेसिंगवर लक्ष देत नाही. अनेकदा आपण एखाद्या जॉबसाठी पात्र असतो मात्र केवळ आपल्या कपडे घालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला तो जॉब मिळू शकत नाही. मात्र यानंतरच्या Interview ला जाताना जर तुमचे कपडे नीटनेटके राहिले तर जॉब तुम्हालाच मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Interview ला जाताना तुमचा ड्रेसिंग कसा असावा याबद्दल माहिती देणार आहोत. सैल कपडे घालू नका Interview दरम्यान घातलेल्या आउटफिट्सची नेकलाइन खूप खाली आणि सैल असू नये. त्याऐवजी तुम्ही हाय- नेक, राउंड नेक किंवा कॅालर नेक शर्ट किंवा टीशर्टचा वापर करू शकता. Job Resume मधील एका फोटोमुळे गेली राहुलची नोकरी; मग फोटो असावा की नसावा? एक्सपर्ट्स म्हणतात… प्रोफेशनल दिसा Interview दरम्यान तुम्ही ब्लेझर देखील घालू शकता. ब्लेझरमुळे प्रोफेशनल दिसण्यास मदत होईल. मात्र खूप उकाडा जाणवत्र असेल तर ब्लेझर वापरू नका.तुमच्या कपड्यांना सुरकुत्या असतील किंवा तुमचे कपडे स्वच्छ नसतील तर तुमचा प्रभाव खराब होऊ शकतो. तुम्ही सकारात्मक छाप पाडण्याचा प्रयत्न करत असताना तुमच्या कपड्यांच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छ कपडे घाला. दागिने घालू नका आपण वेस्टर्न किंवा भारतीय परिधान केलेले असो मात्र त्यावर जास्त असेसरीज घालू नका. दागदागिने घालू नका. यामुळे तुमच्या हातातून जॉब जाऊ शकतो. Notice Period वर असताना विशालनं केलं असं काही की करिअर आलं धोक्यात? तुम्ही करू नका ‘या’ चुका कपड्यांचा रंग ठरवा ऑनलाइन Interview साठी साधे कपडे निवडा. बर्याच प्रिंट्स आणि नमुन्यांसह कपडे घालू नका. जर तुमच्या खोलीचा रंग गडद असेल तर फिकट रंगाचे (Faint colors) कपडे घाला, जर खोली रंगीत असेल तर गडद रंगाचे कपडे घाला. तसंच मुलाखतीसाठी आक्षी निळा रंग, नेव्ही ब्लु रंग, फिकट गुलाबी रंग, क्रीम रंग, अशा प्रकारचे शिर्ट्स घालून जाणं चांगलं. शक्यतो चेक असलेले शर्ट मुलाखतीला घालून जाऊ नका. ला रंगाचा शर्ट रिक्रुटरला व्यथित करू शकतो म्हणून ला रंगाचे कपडे घालणं टाळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.