मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Notice Period वर असताना विशालनं केलं असं काही की करिअर आलं धोक्यात? तुम्ही करू नका 'या' चुका

Notice Period वर असताना विशालनं केलं असं काही की करिअर आलं धोक्यात? तुम्ही करू नका 'या' चुका

तुम्ही करू नका 'या' चुका

तुम्ही करू नका 'या' चुका

आज आम्ही तुम्हाला विशालचा अनुभव सांगणार आहोत. त्याने Notice Period वर असताना नक्की काय केलं ज्यामुळे त्याचं करिअर धोक्यात आलं हे सांगणार आहोत.

मुंबई, 22 सप्टेंबर: एका कंपनीला सोडून जाताना आणि नवीन ठिकाणी जॉईन करतानाचा काळ म्हणजे Notice Period. प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड ठेवते. जॉबचा राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरेड पूर्ण करूनच कंपनी पूर्ण[ने सोडता येते. काही कंपन्यांमध्ये हा नोटीस पिरेड वर्क महिन्याचा असतो तर काहींमध्ये तीन महिन्याचा. मात्र बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी हा काळ त्रासदायक असतो असं अनेक जण सांगतात. या काळात कंपनीकडून अपेक्षित सपोर्ट मिळत नाही असं काही जण म्हणतात. मात्र असं असेलच असं नाही. काही कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरेड चांगलाही ठरतो. पण जर तुम्हीही नोटीस पिरेडवर आहात किंवा नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला विशालचा अनुभव सांगणार आहोत. त्याने Notice Period वर असताना नक्की काय केलं ज्यामुळे त्याचं करिअर धोक्यात आलं हे सांगणार आहोत. तसंच तुम्ही काय चुका करू नयेत हेही सांगणार आहोत. विशाल हा काही वर्षांपूर्वी ग्रॅज्युएट होऊन IT सेक्टरमध्ये कमला लागला होता. अनुभवानुसार विशालचं पॅकेजही आता कंपनीनं वाढवलं होतं. त्यामुळे विशाल खुश होता. मात्र एक दिवस अचानक त्याला परदेशातील मोठ्या कंपनीकडून जॉबची ऑफर आली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने पगार-पाणी सगळं विचारपूस करून ती नवीन कंपनी जॉईन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या जुन्या कंपनीत विशालने राजीनाम्याचा मेल पाठवला. रेसिग्न केल्यानंतर विशालला सगळ्यात कठीण काळ म्हणजे नोटीस पिरेड काढायचा होता. हा काळ थोडा थोडका नसून तब्बल एक महिन्याचा होता. मात्र विशाल अनुभवी असल्यामुळे त्याला नोटीस पिरेडचं गांभीर्य नव्हतं. आपण राजीनामा दिला आहे आणि आता आपण फ्री आहोत असं विशालला वाटायला लागलं. त्यामुळे तो बॉसच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू लागला. तसंच आपल्या सहकाऱ्यांशी वाईट बोलू लागला. परदेशात नोकरी मिळाल्याचा अहंपणा बहुतेक त्याच्यात आला होता. Data Science की Computer Science? नक्की कोणाला मिळतं जास्त पॅकेज? असं निवडा परफेक्ट करिअर
तब्बल एक महिना विशालने ऑफिसमध्ये कोणाशीच चांगले संबंध ठेवले नाहीत. सहकाऱ्यांशी, बॉससोबत तो भांडू लागला. काम करण्यास टाळाटाळ करू लागला महिनाभरात एकही काम त्यानं केलं नाही. अखेर नोटीस पिरेड संपून तो परदेशात गेला. तिथे गेल्यानंतर मात्र जे घडलं ते भयानक होतं. ज्या कंपनीनं त्याला ऑफर केली होती त्या नावाची कुठली कंपनीचं नव्हती. विशालने बरीच विचारपूस केल्यानंतर त्याला हे समजलं की त्याची फसवणूक झाली आहे.
त्याने तातडीनं आपल्या जुन्या कंपनीतील बॉसला, सहकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीहे फायदा झाला नाही. त्याचे संबंध वाईट असल्यामुळे कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. तसंच त्याची नोकरीही गेली असल्यामुळे तो निराश झाला. अखेर भारतात परत आला आणि कमी पगारावर काम करू लागला. विशालला त्याची चूक समजली होती. जुनं ऑफिस सोडताना किंवा नोटीस पिरेडवर असताना आपलं वागणं त्याला कळलं होतं. पण तुम्हीही अशा चुका तर करत नाही ना? नोटीस पिरेडवर असताना हे करा याबाबत एक्सपर्ट्स म्हणतात, तुमचा नोटिस पिरेड वर असताना स्वत: कमी काम करण्याचा विचार येतो. मात्र असा करू नका. नोटीस पिरेड दरम्यान तितक्याच ऊर्जेने काम करा. तुमच्या कामात कमीपणा जाणवल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच कामात कमीपणा आणू नका. तुमचा नोटिस पिरेड वर असताना तूम्हाला तुमच्या कामाच्या शेवटच्या दिवसाबद्दल तुमचे क्लायंट, सहयोगी आणि सहकाऱ्यांना अपडेट करणे देखील आवश्यक आहे. तुमची बदली होईपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या व्यवस्थापकाचे संपर्क तपशील प्रदान करू शकता किंवा कार्यसंघातील पुढील कमांड देखील देऊ शकता. नोटीस पिरेडवर असताना नेहमी तुमच्या सहकाऱ्यांसोबत नेहमी चांगले वागा. जरी तुम्ही ही कंपनी सोडून जात असाल तरी तुमचे संबंध टिकवून ठेवा. ऑफिसमध्ये असताना तुमच्या मॅनेजर किंवा बॉससोबत भविष्यातील संधींबाबत संवाद साधा. तसंच तुमच्या बॉससोबत चांगले संबंध तयार करा. हे कधीच करू नका जरी तुम्हाला असे वाटत असेल की बहुतेक कामाचा भार तुमच्या खांद्यावर आहे, त्यामुळे तुमच्या डेस्कवर काम करण्यास टाळाटाळ करू नका. यामुळे तुमचं इम्प्रेशन कमी होऊ शकतं. तुम्ही वैयक्तिक फोन कॉल्स घेण्याऐवजी किंवा सोशल मीडियावरून स्क्रोल करण्याऐवजी तुमच्या टीममेट्सना तुमची मदत देऊ शकता. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचे चांगले संबंध राहतील. नवीन ऑफिस, त्यांच्या मस्त ऑफिस स्पेसेस, एंटरटेनमेंट झोन इत्यादींबद्दल उत्साही वाटणे स्वाभाविक आहे, परंतु तुमच्या टीममध्ये याबद्दल बढाई मारू नका. Job Resume मधील एका फोटोमुळे गेली राहुलची नोकरी; मग फोटो असावा की नसावा? एक्सपर्ट्स म्हणतात... (Note: वरील सांगितलेली गोष्ट ही संपूर्णतः काल्पनिक असून तिचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना सजग करण्याचा आहे. ज्यामुळे त्यांना त्याचा जॉब गमवावा लागणार नाही.)
First published:

Tags: Career, Digital prime time, Job, Job alert, Jobs Exams

पुढील बातम्या