कल्याण-डोंबिवली, 23 सप्टेंबर: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Municipal Corporation) विविध पदांच्या तब्बल 26 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (KDMC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत आणि थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक (Centre Head cum Quality Manager) वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician)
Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) - MD Micro/MD Path पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक (Centre Head cum Quality Manager) - M.Sc/B.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) - B.Sc, DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - B.Sc, DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. हे वाचा - Pune Metro Recruitment: पुणे मेट्रो रेल्वेमध्ये तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) - ओपन - 01 जागा केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक (Centre Head cum Quality Manager) - ओपन - 01 जागा वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) - OPEN - 05, SC - 02, ST- 01, VJ- 01, OBC-02, EWS-01 कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - OPEN - 05, SC - 02, ST- 01, VJ- 01, OBC-02, EWS-01 इतका मिळणार पगार सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) - 85,000/- रुपये प्रतिमहिना केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक (Centre Head cum Quality Manager) - 35,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) - 30,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 22,500/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा आणि मुलाखतीचा पत्ता आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.). हे वाचा - फेस्टिव्ह सीजनआधी Flipkart मध्ये नोकरीची संधी, 4000 लोकांना मिळेल जॉब मुलाखतीची तारीख - 30 सप्टेंबर 2021
| JOB TITLE | Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2021 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक (Centre Head cum Quality Manager) वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) |
| शैक्षणिक पात्रता | MD Micro/MD Path, B.Sc, DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. |
| प्रवर्गासाठी किती जागा | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) - ओपन - 01 जागा केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक (Centre Head cum Quality Manager) - ओपन - 01 जागा वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) - OPEN - 05, SC - 02, ST- 01, VJ- 01, OBC-02, EWS-01 कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - OPEN - 05, SC - 02, ST- 01, VJ- 01, OBC-02, EWS-01 |
| इतका मिळणार पगार | 22,500/- - 85,000/- रुपये प्रतिमहिना |
| मुलाखतीचा पत्ता | आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.). |
| मुलाखतीची तारीख | 30 सप्टेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

)







