मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

नोकरीची सुवर्णसंधी! शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 'या' पदांसाठी Vacancy; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

नोकरीची सुवर्णसंधी! शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 'या' पदांसाठी Vacancy; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 डिसेंबर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Recruitment 2021) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Kolhapur) जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक (Trainee Library Assistant) - एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक (Trainee Library Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी M. Lib. & Information Science मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच MS-CIT/Certificate/Diploma in Computer याचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

तुम्हालाही Politics ची प्रचंड आवड आहे? मग निवडणूक न लढवताही करू शकता करिअर

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय हे 38 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.

मागासवर्गासाठी - मागासवर्गातील उमेदवारांचं वय हे 43 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.

इतका मिळेल पगार

प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक (Trainee Library Assistant) - 400/- रुपये प्रतिदिवस

काही महत्त्वाच्या सूचना

ही पदभरती करारपद्धतीवर केली जाणार आहे.

केवळ अकरा महिन्यांच्या काळासाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि निवड समिती या संदर्भात अंतिम निर्णय घेईल.

उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी सर्वांसह त्यांचे अर्ज छापील स्वरूपात सादर करावे.

तपशील मुलाखतीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी कामाच्या वेळेत ग्रंथालय कार्यालयात किंवा उमेदवार ते मुलाखतीच्या दिवशी सबमिट करू शकतात.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

B. B. K ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Bank Jobs: मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी होणार भरती

मुलाखतीची तारीख - 14 डिसेंबर 2021

JOB TITLE Shivaji University Recruitment 2021
या पदांसाठी भरतीप्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक (Trainee Library Assistant) - एकूण जागा 20
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी M. Lib. & Information Science मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच MS-CIT/Certificate/Diploma in Computer याचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
वयोमर्यादाखुल्या प्रवर्गासाठी - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय हे 38 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. मागासवर्गासाठी - मागासवर्गातील उमेदवारांचं वय हे 43 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगारप्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक (Trainee Library Assistant) - 400/- रुपये प्रतिदिवस
काही महत्त्वाच्या सूचनाही पदभरती करारपद्धतीवर केली जाणार आहे. केवळ अकरा महिन्यांच्या काळासाठी ही पदभरती करण्यात येणार आहे. फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि निवड समिती या संदर्भात अंतिम निर्णय घेईल. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी सर्वांसह त्यांचे अर्ज छापील स्वरूपात सादर करावे. तपशील मुलाखतीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी कामाच्या वेळेत ग्रंथालय कार्यालयात किंवा उमेदवार ते मुलाखतीच्या दिवशी सबमिट करू शकतात.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdd7uNfoun1d_tuIOrspi1bnbKr4LoZ-CJkPEUql1mhAdWXQg/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0 या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Kolhapur, जॉब