मुंबई, 08 डिसेंबर: आजकाल तरुणाईच्या मनात राजकारणाविषयीची (career in politics) आवड प्रचंड वाढत चालली आहे. अनेक तरुण-तरुणी राजकारणाकडे आपलं भविष्य म्हणून बघत आहेत. मात्र अनेकांना विचारल्यास निवडणूक लढवण्यात (Election in India) अनेकजण आवड नाही म्हणून सांगतात. मात्र निवडणूक न लढवता, नेता न होता राजकारणात करिअर (Career in Politics without election) शक्य आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो. याचं उत्तर अगदी सोपं आहे. नेता किंवा राजकारणी न होताही राजकारणात करिअर शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका करिअर ऑप्शनबद्दल (career options in politics) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.
निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी एक्झिट पोल घेतले जातात. एक्झिट पोल किंवा मतदानपूर्व सर्वेक्षणाचे काम सोपे नाही. हे काही लोकांच्या विशेष मेहनतीचे फळ आहे. त्यांना इलेक्शन अॅनालिस्ट (Election Analyst) किंवा सेफोलॉजिस्ट जॉब्स म्हणतात. यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. इलेक्शन अॅनालिस्ट (How to become Election Analyst) कसं होणार? याबद्दल जाणून घेऊया.
राजकारणात आकडेवारी आणि लोकांच्या वृत्तीची कसोटी लागते. निवडणूक विश्लेषक म्हणून यामध्ये माहिती आणि तथ्ये (Election Analyst Jobs) एकत्र केली जातात. निवडणुकीपूर्वीची मागील वर्षांची आकडेवारी, निवडणुकीदरम्यानची मतदानाची टक्केवारी आणि त्यानंतर फायदे-तोटे, युती इत्यादींवर सखोल संशोधन केले जाते. आता राजकीय पक्षही इलेक्शन अॅनालिस्ट सेवा मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
हे कोर्स आहेत महत्त्वाचे
राज्यशास्त्रात बी.ए
समाजशास्त्रात बी.ए
सांख्यिकी मध्ये BA
राज्यशास्त्रात एम.ए
समाजशास्त्रात एमए
सांख्यिकी मध्ये एमए
राज्यशास्त्रात पीएचडी
इथे मिळू शकते नोकरी
या क्षेत्रातील व्यावसायिकांना सरकारी () आणि खाजगी दोन्ही ठिकाणी भरपूर संधी मिळतात. निवडणूक सर्वेक्षण किंवा संशोधन करणार्या एजन्सी, वृत्तवाहिन्या, प्रिंट मीडिया हाऊस, प्रमुख राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्था यांना याची गरज आहे. याशिवाय राजकीय सल्लागार, अध्यापन, संसदीय कामकाज आणि राजकीय अहवाल मध्येही या लोकांची मागणी वाढत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Politics