मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुपर ट्रेंडिंग आणि लाखो रुपये पॅकेज देणाऱ्या IT क्षेत्रात नोकरी तुमचीच; फक्त जॉब सर्चआधी 'या' टिप्स वाचा

सुपर ट्रेंडिंग आणि लाखो रुपये पॅकेज देणाऱ्या IT क्षेत्रात नोकरी तुमचीच; फक्त जॉब सर्चआधी 'या' टिप्स वाचा

जॉब सर्चआधी 'या' टिप्स वाचा

जॉब सर्चआधी 'या' टिप्स वाचा

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला IT क्षेत्रात जॉब घेणं सोपं होईल. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 डिसेंबर: IT म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सध्या प्रचंड उसळी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला विलक्षण पॅकेजेस आहेत . तर अनेक लोक आपलं क्षेत्रं सोडून IT क्षेत्रात नोकरी करत आहेत. इथे मिळणार पगार आणि सुविधा कर्मचाऱ्यांना मोहित करणाऱ्या आहेत. म्हणून तरुणाईचा कल हा आयटी क्षेत्राकडे वाढत चालला आहे. पण आयटी क्षेत्रात जॉब घेणं तितकं सोपं नाही. बऱ्याच जणांना आयटीमध्ये जॉब घेण्यात अडचणी येतात. पण आता टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला IT क्षेत्रात जॉब घेणं सोपं होईल. चला तर मग जाणून घेऊया.

सुरुवातीला चांगला CV बनवा

नोकरी मिळवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योग्य CV (Curriculum Vitae – CV) बनवावा लागेल. तुम्ही एखाद्या विशिष्ट पोस्टसाठी चांगला रेझ्युमे देखील बनवू शकता. जाणून घ्या, CV तुमच्या शैक्षणिक पात्रतेचा संपूर्ण तपशील सादर करतो, त्यामुळे तो मोठा किंवा लहान असू शकतो. याउलट, रेझ्युमे तुमच्या कौशल्यांचे आणि पात्रतेची माहिती असते.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता रेल्वे भरतीच्या 'या' पदांसाठी UPSC आयोजित करेल परीक्षा; असं असेल पॅटर्न

कोणत्या पदांसाठी इंटरेस्ट आहे ते ओळखा

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या आवडीची क्षेत्रे माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही कॉलेज कॅम्पस भरतीसाठी जाऊ शकता. यानंतर तुम्ही अशा ग्रुप्समध्ये सामील व्हाल जिथे नोकरीची माहिती उपलब्ध असेल. तुम्ही कोणत्याही भरती वेबसाइटवर तुमचे खाते तयार करू शकता. होय, तुमचे खाते येथे सर्व आवश्यक माहितीसह अपडेट ठेवा.

रिजेक्शनला घाबरू नका

तुम्हाला नोकरीसाठी सतत प्रयत्न करत राहावे लागेल. हे काही सोपे काम नाही. तुम्हाला अनेक वेळा नकाराचा सामना करावा लागू शकतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा प्रयत्न करणार नाही. तुम्हाला ईमेल वगैरे तपासत राहावे लागेल. नोकरीत यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे कामाची आवड असायला हवी.

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

टाइम मॅनेजमेंट करा

नोकरीशी संबंधित ई-मेल्सना उत्तर देण्यास उशीर करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होईल. यासोबतच तुमचे कौशल्यही वाढवत राहा. तुम्ही सोशल नेटवर्किंग साइटवर वेळ घालवत असाल तर त्याचा वापर नेटवर्किंगसाठी करा. यामुळे तुमचा संपर्क त्या क्षेत्राशी संबंधित अशा लोकांशी राहील. जसे की Linkedin आणि इतर.

Mega Job Alert: 1-2 नव्हे तब्बल 13,404 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती; संधी सोडू नका; करा अप्लाय

कोणत्याही जॉबआधी कंपनी प्रोफाइल बनवा

जॉब साइट्सद्वारे नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु कोणत्याही कंपनीमध्ये अर्ज करण्यापूर्वी त्याची प्रोफाइल तपासा. इंडस्ट्रीचे प्राथमिक ज्ञान ठेवा आणि तिथल्या लोकांशी नेटवर्किंग करण्याचा प्रयत्न करत राहा. लक्षात ठेवा, पहिल्या कामात अनुभवाची चर्चा नसते. तिथे फक्त उद्योगाच्या मूलभूत गोष्टी विचारल्या जातील.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams