Home /News /career /

Sarkari Naukri 2021: पदवीधर आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी इथे आहे नोकरीची संधी

Sarkari Naukri 2021: पदवीधर आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी इथे आहे नोकरीची संधी

सध्याच्या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी सरकारी नोकरीची (Government Job) एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

नवी दिल्ली, 23 जुलै: सध्याच्या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी सरकारी नोकरीची (Government Job) एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. अगदी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसह पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी संस्थेत काही पदं (Job Alert) भरतीसाठी खुली झाली आहेत. नवी दिल्लीत असलेल्या राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेमध्ये (National Malaria Research Institute) विविध पदांसाठी भरती करण्यात येणार असून संस्थेतर्फे याबाबत अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवार संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार एकूण 6 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर इथे मोठी पदभरती; 75 हजार रुपये मिळणार पगार या पदांवर भरती होईल : संशोधन सहाय्यक (Research Associate) – 2 जागा कीट कलेक्टर (Kit Collector) - 2 जागा मल्टीटास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) - 2 जागा शैक्षणिक पात्रता : संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एससी पदवी असणं आवश्यक आहे. तर कीट कलेक्टर आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारासाठी वयोमर्यादा 25 ते 30 वर्षे अशी आहे. किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 30वर्षे असणं अपेक्षित आहे. निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे (Interview) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेली अधिकृत अधिसूचना पहावी. त्यात सर्व सविस्तर माहिती मिळेल. महत्त्वाच्या तारखा : अधिसूचना जारी झाल्याची तारीख – 19 जुलै 2021 मुलाखतीची तारीख – 5 ऑगस्ट 2021 अधिकृत वेबसाइट - nimr.org.in सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, खासगी उद्योग धंदे बंद पडल्यानं अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. खासगी क्षेत्रातही (Private Sector) सध्या नोकर भरतीचं प्रमाण खूप कमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई इथे मोठी भरती; या पदांसाठी करा अर्ज नोकऱ्यांची वानवा असल्यानं पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले (Degree Holder) असंख्य उमेदवार चिंतेत असून, हजारो तरुण मुलं योग्य नोकरीच्या शोधात आहेत. कमी पगारावर नोकरी करण्याची तयारीही अनेक लोकांनी दर्शवली आहे. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीची(Government Job) संधी उपलब्ध होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब असून अनेक पात्र उमेदवारांना आपलं नशीब आजमावण्याची संधी यामुळं मिळणार आहे. त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही काही पदं असल्यानं अशा उमेदवारांसाठीही एक सुवर्णसंधीच या नोकर भरतीमुळे खुली झाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेबसाइटवर जाऊन अधिकृत अधिसूचनेत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून तयारी केल्यास त्यांना चांगली नोकरी नक्कीच मिळू शकेल.
First published:

Tags: Job alert, Jobs

पुढील बातम्या