मुंबई, 21 जुलै: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स मुंबई (IIBF Mumbai Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली आहे. कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) या पदासाठी ही भरती असणार आहे. एकूण 10 रिक्त जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी होणार भरती
कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) - एकूण जागा 10
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वाणिज्य / अर्थशास्त्र / व्यवसाय व्यवस्थापन या विषयांमध्ये प्रथम श्रेणीत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संगणकाचं ज्ञाहन असणं आवश्यक आहे.
हे वाचा - COEP Pune Recruitment: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे मोठी पदभरती; लगेचच करा अर्जवयोमर्यदा
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 28 वर्षांच्या वर नसावं.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.